
RCB vs UPW, WPL 2026: RCB is 144 runs away from the final! A half-century innings from Deepti Sharma of UP Warriors.
RCB vs UPW, WPL 2026 : आज महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने आले आहेत. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात टॉस गमावणाऱ्या यूपी वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करत दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर ८गडी गामावत १४३ धावा उभ्या केल्या आहेत. आरसीबीला अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना १४४ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीकडून नादिन डी क्लार्कने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यापूर्वी आरसीबी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यूपी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. यूपी संघाची सुरुवात चांगली झाली. मेग लॅनिंग आणि दीप्ती शर्मा या सलामीवीरांनी ८ षटकात ७४ धावांची सलामी दिली. दरम्यान, मेग लॅनिंग ३० चेंडूत ४१ धावा केल्या. तिला नादिन डी क्लार्कने बाद केले.
यानंतर मात्र यूपी संघाची चांगलीच वाताहत झाली. एकामागून एक विकेट पडत गेल्या. ७४ धावांवर १ विकेट अशा परिस्थिती असणार संघ थेट १०३ धावांवर ४ विकेट्स अशा संकटात जाऊन पोहचला. त्यानंतर विकेट्स जात राहिल्या. सिमरन शेख १० , एमी जोन्स १, हरलीन देओल १४, क्लो ट्रायॉन ६, श्वेता सेहरावत ७, सोफी एक्लेस्टोन ० धावा करून झाल्या. एक बाजू सांभाळत दीप्ती शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. दीप्तीने ४३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची खेळी ती करून बाद झाली. त्यानंतर आशा शोभना जॉय ० तर शिखा पांडे ० धावा करून नाबाद राहिल्या. यूपी वॉरियर्सकडून नादिन डी क्लार्कने ४ विकेट्स घेतल्या तर ग्रेस हॅरिसने २ विकेट्स काढल्या, तसेच श्रेयंका पाटील आणि लॉरेन बेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! #UPW set a target of 1⃣4⃣4⃣ 🎯 Will they defend it or will #RCB chase it down? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/IgbbgWV0xt #TATAWPL | #KhelEmotionKa | #UPWvRCB pic.twitter.com/nxBzlaOFGL — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 29, 2026
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: मेग लॅनिंग (क), सिमरन शेख, एमी जोन्स (डब्ल्यू), हरलीन देओल, क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, राधा यादव, रिचा घोष (डब्ल्यू), नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल