शेफाली वर्माने ८ वर्षांचा जुना विक्रम मोडला(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SA W, ICC Women’s ODI World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ जेतेपदासाठी आमनेसामने आहेत. हा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष दिले आहे. आफ्रिकेचा संघ आता लक्ष्याचा पाठलाग करत आहे. दरम्यान भारताची युवा सलामीवीर शफाली वर्माने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकवत एक विक्रम रचला आहे. उपांत्य फेरीपूर्वी सलामीवीर प्रतीका रावल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर तिला संघात स्थान देण्यात आले. तिने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. यासोबतच तिने एक ८ वर्ष जुना विक्रम देखील मोडला आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात शफालीने तिच्या नैसर्गिक आक्रमक शैलीने फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले. तिने ७८ चेंडूत ८७ धावा फटाकावल्या आहेत. यामध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे भारताला केवळ चांगली सुरुवात मिळाली नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवरही दबाव निर्माण करण्यास मोठी मदत झाली.
या खेळीसह, शेफालीने महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला. यापूर्वी, हा विक्रम पूनम राऊतच्या नावावर होता, ज्याने २०१७ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८६ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडून, शेफालीने केवळ भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला नाही तर तिच्या फलंदाजीने संघाचा मजबूत पाया देखील रचला त्यामुळे भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २९८ धावांचा डोंगर उभा केला.
शेफाली वर्माने शानदार खेळीसह आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे रचला इतिहास. ती आता महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जेस कॅमेरॉन (आता जेस डफिन) यांच्या नावावर होता, ज्याने २०१३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. त्यावेळी जेसचे वय २३ वर्षे २३५ दिवस होते, तर शफालीने केवळ २१ वर्षे २७८ दिवसांच्या वयात ही कामगिरी करून दाखवली.
हेही वाचा : IND W vs SA W Final Match Live : स्मृती मानधनाची जेतेपदाच्या सामन्यात इतिहासाला गवसणी! ‘या’ माजी कर्णधाराला दिला धोबीपछाड
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे सुरू आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिके महिला संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर ७ बाद २९८ धावा केल्या आहेत.






