नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे एकापेक्षा जास्त फलंदाज आहेत ज्यांनी धावा आणि शतके झळकावली आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, असे काही दुर्दैवी फलंदाज आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही कसोटी शतक झळकावता आले आहे. या यादीत अनेक धक्कादायक नावांचा समावेश आहे.
चला तर या ३ फलंदाजांवर एक नजर टाकूया:
१.आकाश चोप्रा
आकाश चोप्रा देखील सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी एकही शतक झळकावू शकला नाही. २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या आकाश चोप्राला सलामीवीर म्हणून शतक झळकावता आले नाही. आकाश चोप्राने भारतीय संघासाठी केवळ एक वर्ष कसोटी क्रिकेट खेळले, ज्यामध्ये त्याने १० सामन्यांत ४३७ धावा केल्या. मात्र त्याला एकही शतक झळकावता आले नाही. आकाश चोप्राने कसोटी सामन्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ६० आहे. खराब कामगिरीमुळे आकाश चोप्राला भारतीय संघातून बाहेर व्हावे लागले, त्यामुळे त्याची कारकीर्दही संपुष्टात आली.
२. अजय जडेजा
अजय जडेजा देखील अशा क्रिकेटपटूंपैकी एक होता, ज्यांनी सलामीवीर म्हणून आपल्या कसोटी कारकिर्दीत कधीही शतक केले नाही. जरी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ शतके झळकावली आहेत. अजय जडेजाने ११९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत १५ कसोटी सामने खेळले, परंतु एकही कसोटी शतक झळकावण्यात अपयशी ठरला. अजय जडेजा शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण तो पूर्ण करू शकला नाही. अजय जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ९६ धावा आहे. अजय जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४ अर्धशतके झळकावत ५७६ धावा केल्या.
३. अभिनव मुकुंद
अभिनव मुकुंदने २०११ मध्ये सलामीवीर म्हणून भारतीय संघात स्थान मिळवले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर अभिनव मुकुंदला भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अभिनव मुकुंदला त्याच्या कारकिर्दीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अभिनव मुकुंदने भारतीय संघासाठी फक्त ७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३२० धावा केल्या आहेत आणि एकही शतक झळकावले नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून संधी मिळाल्यानंतर त्याचा फायदा उठवला नाही. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८१ धावा आहे. हेच कारण आहे की मुकुंद कधीही निवडकर्त्यांना आकर्षित करू शकला नाही. त्यामुळे त्याला संघ सोडावा लागला.