Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी 270 कोटींचा खर्च कशासाठी?; जयंत पाटलांनी केली राज्य सरकारची पोलखोल

राज्य  सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे-फडणवीस- पवार सरकारने 'विशेष प्रसिद्धी मोहिम' राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी तब्बल 270 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.  विशेष म्हणजे या मोहिमेसाठी  माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या अंदाजित   खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2024 | 02:30 PM
विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी 270 कोटींचा खर्च कशासाठी?; जयंत पाटलांनी केली राज्य सरकारची पोलखोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नुकताच राज्यसरकारने शासनआदेश जाहीर केला आहे. सर्व योजनांसाठी २७० हजार कोटी सरकार पुढच्या दोन महिन्यात खर्च करणार आहे. ही शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी मोहिम आहे असं दिसत नाही, ही निवडणुकीसाठी प्रसिद्धी आहे. आपला स्वत:चा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करण्याचा सरकारचा कार्यक्रम दिसतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

राज्य  सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे-फडणवीस- पवार सरकारने ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी तब्बल 270 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.  विशेष म्हणजे या मोहिमेसाठी  माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या अंदाजित   खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. या  योजनेवरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.  जयंत पाटील यांनीही  या योजनेवरून शिंदे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नसून स्वत:चंच पुर्नवसन करण्यासाठी आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ऐनकेन प्रकारे जनतेच्या समोर राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी जेवढी सत्ताधारी पक्ष स्वत:ची प्रसिद्धी करतील तेवढू सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल राग वाढत जाईल. आज राज्याची परिस्थिती काय आहे? राज्यावर कर्जाचा बोझा आहे, नवीन बांधलेल्या रस्त्यांनाही भेगा गेल्या आहेत, राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था खराब झाली आहे. शेतकऱ्यांची वेगवेगळ्या अडचणी आहेत. पीएचडीचे विद्यार्थी आंदोेलन करत आहेत हे सर्व सुरू असताना, राज्यावरचा कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेला आहे. सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही स्वत:चं पुर्नवसन करण्यासाठी आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

काय आहे राज्य सरकारची ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ ?

राज्य विधीमंडलाच्यापावसाळी अधिवेशनात  अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’, ‘महिलांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर गॅस अशा योजनांची घोषणाही केली. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे सरकारने ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ सुरू करायची आहे.  या योजनेसाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

 

Web Title: Jayant patil criticized maharashtra government over special publicity campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
1

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
2

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.