Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा मी देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहीन, असे पडळकर म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2025 | 06:34 PM
. Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; 'चौफेर' उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

. Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; 'चौफेर' उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

Follow Us
Close
Follow Us:

गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाटलांचा एकेरी उल्लेख 
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला- पडळकर 
धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण मिळवून देणारच- पडळकर 

सांगली: आरक्षणाबाबत कित्येक वर्षांपासून लढाई सुरू आहे. आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज झगडतोय, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, न्यायालयीन लढाई लढू, सत्तेत राहून समाजाची भूमिका मांडू, पण धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण मिळवून देणारच, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील विरोबा बनात मंगळवारी बहुजनांच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. पडळकर म्हणाले, कायद्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यानुसार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी गोपीचंद पडळकर काल, आज आणि उद्याही धनगर समाजाच्या बाजूने असेल. आरक्षणाबाबत ज्यावेळी सरकार आणि धनगर यांच्यामध्ये वाद असेल, त्यावेळी मी धनगरांच्या बाजूने असेन. सरकार आणि विरोधक हा विषय असेल, त्यावेळी मी सरकारच्या बाजूने असेन.

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा पडळकर देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहील.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले! जयंत पाटलांच्या वडिलांचे नाव घेत वापरली अर्वाच्च भाषा

जयंत पाटलांवर एकेरी भाषेत टीका 
यांच्यावर सडकून टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. भाषणाच्या प्रारंभापासून आमदार पाटील यांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला. ‘मंगळसूत्र चोरी’ या विषयावर पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन आमदार पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे सहकारी दिलीप पाटील यांचा नामोल्लेखही पडळकर यांनी केला नाही; परंतु त्यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीकेची झोड उठवली. मला काही जण टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान पडळकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. आधी देखील त्यांनी जयंत  पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली होती. मात्र तरीदेखील पडळकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पडळकर यांच्या चौफेर उधळलेल्या वाणीवर लगाम घालणार का हे पहावे लागणार आहे.
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला, त्याप्रमाणे कवठेमहांकाळचा कारखानाही ढापण्याचा उद्योग चालवला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला. ‘लव्ह जिहाद’ विरोधात तसेच पाद्रीविरोधात मी भूमिका घेतली, त्यावेळी मला बदनाम करण्याचा उद्योग जयंत पाटील यांनी केल्याचे ते म्हणाले. ‘लव्ह जिहाद’ विषयावर राज्यभरात ३६ मोर्चे निघाले. हे हिंदूविरोधी आहे, हे ईश्वरपूरच्या लोकांनी हे ध्यानात ठेवायला हवे, असेही पडळकर म्हणाले.

Web Title: Gopichand padalkar criticizes to jayant patil cm devendra fadnavis maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • gopichand padalkar
  • jayant patil
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
1

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
2

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
3

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
4

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.