राज्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान
अजूनही काही राज्यात पुरस्थिती कायम
राज्याने ९९.०६ टक्के एफआरपी केली अदा
मुंबई: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी बेसिक उतारा १०.२५ टक्के विचारात घेऊन प्रति मेट्रीक टन ३ हजार ५५० रुपये वाजवी लाभदर (एफआरपी) देण्यात येणार आहे. गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये ९९ सहकारी व १०१ खासगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना ३१ हजार ३०१ कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.
राज्याने ९९.०६ टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये १०० टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या १४८ आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात २०२४ -२५ मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज २९८ कोटी युनिट्स असून कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न १९७९ कोटी रुपये आहे. कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून ६ हजार ३७८ कोटी रुपये उत्पन्न झाले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे राज्यातील साखर कारखान्यांच्या 2025-26 या वर्षातील गाळप हंगामासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी मंत्रिसमितीची बैठक झाली. या बैठकीत ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/CiYpebpLi2 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 30, 2025
बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि सहवीज निर्मिती विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले. बैठकीपूर्वी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने, राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शविणाऱ्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.
Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
मंत्रीमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रावरील सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडला, ज्यामध्ये फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे सर्वात जास्त नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेल, घरं उद्धवस्त झाली आणि पशुधनही पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसामुळे २६ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.