on Latadidi's death. Reaction of Navneet Rana, MLA Ravi Rana
लता मंगेशकर यांच्या जाण्यामुळे देवांची दुनिया श्रीमंत झाली आणि आपली उजाड झाली. कोटयवधींमधील एक आणि शतकातील एक अशा दीदी आमच्या कुटुंबासाठी दैवतच होते. आज त्या शरीराने आपल्यातून गेल्या असल्या, तरी त्यांचे गाणे आपल्या मनात आणि गळ्यात कायम राहणार आहे. करोडो लोकांनी अढळपदी अंबरात बसवलेल्या दीदींचा म्या पामराला सहवास लाभला हे पूर्व संचित नाही तर अजून काय. अशी प्रतिक्रीया जयप्रकाश जातेगांवकर यांनी दिली.
[read_also content=”लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला; देवेंद्र फडणवीस https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/devendra-fadnavis-on-lata-mangeshkar-nrvk-233305.html”]
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.