Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kirit Somaiya Threat: ‘आम्ही याच्या घरी जाऊ, जे करायचं ते करू…’; किरीट सोमय्यांना थेट धमकी

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 07, 2025 | 04:49 PM
Kirit Somaiya Threat:  ‘आम्ही याच्या घरी जाऊ, जे करायचं ते करू…’; किरीट सोमय्यांना थेट धमकी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार  किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरून धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट करत सोमय्यांना थेट धमकी दिली असून, येत्या ८ तारखेला त्यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबईसारख्या शहरात सुमारे चार हजार अनधिकृत भोंगे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने मला फेसबुक पोस्ट करून धमकी देणं हे गंभीर असून, मी अशा फालतू गुंडांना घाबरत नाही.” सध्या पोलिसांकडून या धमकीची दखल घेण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Latur Crime News : फोनवर बोलल्यानंतर गोळी झाडली…; लातूर पालिका आयुक्त मनोहरे प्रकरणी धक्कादायक दावा

 काय म्हटलं आहे धमकी देणाऱ्याने

“मी८ तारखेला यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहे. याचा पत्ताही मला आहे.नाहीतर त्याची कॉलर पकडून आम्ही त्याला बाहेर काढ. गवंडी शिवाजीनगर येथील मुसलमानांना माझी विनंती आहे की, आपल्या मशिदींच्या परिसरात पोलिसांची गाडी येत असेल आणि आवाज कमी करण्यासाठी बोलत असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. मला कॉल करा. कोणीही येत आणि काहीही बोलून जाते. आपण त्यांचे ऐकतो. उटसूट कोणीही येतो आणि बोलत सुटतो हे चालणार नाही. हा महाराष्ट्र, ही मुंबऊ बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. भाजपच्या हुकूमशाहीने हा देश चालणार.  किरीट सोमय्यांना फोन केला होता. पण त्यांनी उचलला नाही.घाबरण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, बोबड्या आणि तोतऱ्या माणसांकडून हा महराष्ट्र चालवला जात नाही. ही युपीचे राजकारण आहे. पण मुंबईत असे राजकारण कऱण्याचा प्रयत्न कऱत असाल कर खूप महागात पडेल. त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही, आपल्या मशिदींवरील अजाणचा आवाज पुन्हा सुरू करा.”

मीरा-भाईंदर मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह, ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत मुलांच्या आरोग्याशी खेळ, पालकांनी व्यक्त केला संताप

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील या विधेयकावर स्वाक्षरी करत या विधेयकाला मान्यता दिली. पण या विधेयकामुळे देशभरात, विशेषतः मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ७२ बेकायदेशीर मशिदींवरील लाऊडस्पीकरांविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत  तातडीने कारवाईची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राज्यभरात बांगलादेशी घुसखोरीविरोधात मोहिमही राबवली आहे. या मोहिमेदरम्यान त्यांनी मुंबईसह मालेगाव, अंबड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, अकोला, लातूर आदी ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीचे अनेक प्रकार समोर आणले आहेत. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे याची नोंद घेत कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Kirit somaiya receives open threat from a person named yusuf ansari nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • kirit somaiya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.