लातूर शहर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे आत्महत्या प्रकरणी कुटुंबाचा मोठा दावा (फोटो - सोशल मीडिया)
लातूर : लातूरमधील शहर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण राज्यभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. स्वतःवर गोळी झाडून घेत मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये आत्महत्येचा कारण समोर आले नव्हते. बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यावर गोळी झाडून घेतल्यानंतर गोळी त्यांच्या आरपार गेली आहे. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. लातूर पालिका आयुक्त मनोहरे आत्महत्याच्या प्रयत्न प्रकरणी कुटुंबियांनी धक्कादायक दावा केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लातूर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रकृती चिंताजनक असल्याचे सह्याद्री हॉस्पिटल सांगितले. ही घटना शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. रात्री जेवण करून आयुक्त मनोहरे स्वतःच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक धावत आले. मात्र त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचा फोनवर बोलणं झालं असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोहरे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच आत्महत्येबाबत देखील धक्कादायक बातमी टाकली आहे. बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार मनोहरे यांना कोणाचा तरी फोन आला होता, फोनवर बोलल्याननंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. या प्रकरणाचा पोलीस तपास अद्यार सुरु आहे. दरम्यान आता पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला आहे. मनोहरे हे आयफोन वापरत होते. मनोहरेंना कोणाचा फोन आला? समोरचा व्यक्ती फोनवर बोलला का? नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर नेमकं काय संभाषण झालं याबाबत आता तपास केला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोहरे कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब मनोहरे यांची प्रकतीमध्ये थोडी सुधारणा दिसत आहे. पालिका आयुक्त मनोहरे यांचे पुढील उपचार हे मुंबईमध्ये होणार आहे. त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे, त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. विमानतळापासून ते कोकिलाबेन रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लातूर शहर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (दि.05) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घडली. रात्री जेवण करून आयुक्त मनोहरे स्वतःच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक धावत आले. यानंतर बाबासाहेब मनोहरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांना तातडीने रात्री बारा वाजेच्या सुमारास डॉ. हनुमंत किनीकर यांच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आता मुंबईमध्ये उपचार सुरु आहेत.