Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपचारासाठी भारत सोडला; मेहुल चोक्सीचा कोर्टात दावा

  • By Vanita Kamble
Updated On: Jun 07, 2021 | 07:23 AM
उपचारासाठी भारत सोडला; मेहुल चोक्सीचा कोर्टात दावा
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी, पळपुट्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, मी भारतातून पळून आलो नाही. मी भारतीय कायद्याचे पालन करणारा नागरिक असून फक्त उपचारांसाठी देश सोडला होता. मी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, असे चोक्सीने डोमिनिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, डोमिनिकामधील हायकोर्टात चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित झाली आहे.

मी कायदा पाळणारा नागरिक आहे. केवळ अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी मी भारत सोडला. भारतीय अधिकारी जे प्रश्न विचारतील, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी तयार आहे. ज्यावेळी मी देश सोडला तेव्हा माझ्या विरुद्ध कोणतेही वॉरंट नव्हते. तसेच मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे चौक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. डोमिनिकामधील न्यायालयीन कार्यवाही टाळण्याचा माझा कोणताही हेतू नाही. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यामुळे, मी यातून सुटेल अशी कोणतीही शक्यता नाही, असेही चोक्सीने कबुल केले आहे.

सध्या चोक्सी डोमिनिकामधील तुरुंगात आहे. 23 मे रोजी तो अँटीग्वा आणि बरमुडामधून गायब झाला होता. त्यामुळे इंटरपोलने त्याच्याविरोधात यलो नोटीस जारी केली होती. त्याअंतर्गत डोमिनिकाममध्ये त्याला अटक करण्यात आली. आता भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, जानेवारी 2018 मध्ये चोक्सीने भारत सोडला होता. 13 हजार 500 कोटींचा पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी चोक्सी देश सोडून गेला होता. आणि तेव्हापासून तो अँटिग्वामध्ये राहत होता. 2017 मध्येच चोक्सीने अँटीग्वा आणि बरमुडाची नागरिकता घेतली होती. त्यानंतर चोक्सी कधीच भारतात आला नाही. त्यामुळे सीबीआय आणि ईडीने चोक्सीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

[read_also content=”क्षणात 180 कोटींचा महामार्ग पडला दरीत; डोंगराचा कडा कोसळला https://www.navarashtra.com/latest-news/180-crore-highway-fell-into-the-valley-in-an-instant-the-edge-of-the-mountain-collapsed-nrvk-138573.html”]

[read_also content=”भारतात आढळला कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट; फक्त सात दिवसातच वजन कमी होतो आणि… https://www.navarashtra.com/latest-news/another-dangerous-variant-of-the-corona-virus-found-in-india-lose-weight-in-just-seven-days-and-nrvk-138826.html”]

[read_also content=”कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास कोरोना चाचणी किंवा क्वारंटाईनची गरज नाही; नविन खुलासा https://www.navarashtra.com/latest-news/corona-testing-or-quarantine-is-not-required-if-the-corona-comes-in-contact-with-the-infected-new-revelation-nrvk-138810.html”]

Web Title: Left india for treatment mehul choksi sues in court nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2021 | 07:23 AM

Topics:  

  • Mehul Choksi

संबंधित बातम्या

मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; कॅनरा बँकेतील 55 कोटींचे फसवणूक प्रकरण
1

मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; कॅनरा बँकेतील 55 कोटींचे फसवणूक प्रकरण

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला मोठा झटका; बेल्जियम न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
2

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला मोठा झटका; बेल्जियम न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Mehul Choksi Extradition : चोक्सी भारतीय नागरिक आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न
3

Mehul Choksi Extradition : चोक्सी भारतीय नागरिक आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही
4

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.