Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळले आहे. आता फरार घोषित झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यास कोणताही अडथळा नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 09, 2025 | 11:30 PM
मेहुल चोक्सीची याचिका बेल्जियम सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

मेहुल चोक्सीची याचिका बेल्जियम सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • फरार मेहुल चोक्सीची याचिका बेल्जियम कोर्टाने फेटाळली
  • प्रत्यार्णाविरूद्ध याचिका फेटाळण्यात आली
  • मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा रस्ता मोकळा 
फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा धक्का बसला आहे. बेल्जियमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला आव्हान देणारी त्याची अपील बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या १३,००० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चोक्सी फरार आहे. 

न्यायालयाच्या या निर्णयानंतर, भारतीय एजन्सींना आशा आहे की चोक्सीला लवकरच भारतात आणले जाईल. गेल्या कित्येक वर्षापासून मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. अखेर आता त्याला भारतात आणण्याचा रस्ता मोकळा झाला असल्याचे दिसून येत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट ऑफ कॅसेशनने मंगळवारी आपला निकाल दिला. PTI च्या वृत्तानुसार, त्यांनी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची भारतात प्रत्यार्पणाला आव्हान देणारी अपील फेटाळली. कोर्टाचे अधिकारी हेन्री व्हँडरलिंडेन यांनी माहिती शेअर केली की, कोर्ट ऑफ कॅसेशनने अपील फेटाळले आहे आणि म्हणूनच, कोर्ट ऑफ अपीलचा निर्णय लागू राहील. एप्रिल महिन्यात बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून अजूनपर्यंत तो बेल्जियममध्येच आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अखेर आता रस्ता मोकळा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Mehul Choksi च्या गळ्याजवळचा फास आवळला, कोर्टाचा मोठा झटका; फरार आर्थिक गुन्हेगार घोषित प्रक्रिया सुरूच

या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते

पूर्वी, अँटवर्पमधील अपील न्यायालयाने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता दिली होती. त्यांनी ती अंमलबजावणीयोग्य नसल्याचे घोषित केले. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी कोर्टाचा प्री-ट्रायल सुनावणीचा आदेश कायम ठेवण्यात आला. मुंबई विशेष न्यायालयाचे २०१८ आणि २०२१ चे अटक वॉरंट कायम ठेवण्यात आले. यामुळे चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला.

चोक्सी आर्थर रोड तुरुंगातच राहील का?

यापूर्वी, भारतीय संस्थांनी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील सुविधांचे फोटो आणि सादरीकरण बेल्जियमच्या न्यायालयाला सादर केले. भारताने बेल्जियमच्या न्यायालयाला आश्वासन दिले की मेहुल चोक्सीला मानवी परिस्थितीत ठेवण्यात येईल. चोक्सीने असे म्हटले होते की त्याला भारतात राजकीय छळ आणि अमानवी वागणूक मिळण्याचा धोका आहे. तथापि, न्यायालयाने असे म्हटले आहे की भारतात त्याचा छळ होईल किंवा त्याला अन्याय खटला चालवावा लागेल याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आता भारतीय तुरुंगात त्याची रवानगी करण्यात येईल. चोक्सीला आता भारतात आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यानंतर चोक्सीला भारतीय कायद्याप्रमाणे कोणती शिक्षा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि त्याहीपेक्षा त्याला भारतात कधी आणले जाणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. 

फ्लॅटपासून ते रत्नांपर्यंत… मेहूल चोक्सीची ४६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा होणार लिलाव ; न्यायालयाने दिली मान्यता

Web Title: Belgium top court rejected mehul choksi appeal against extradition regarding fugitive diamantaire details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • Business News
  • Mehul Choksi
  • PNB Scam

संबंधित बातम्या

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय
1

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!
2

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, कुठपर्यंत पोहलची मजल
3

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, कुठपर्यंत पोहलची मजल

Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
4

Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.