Viral Video: 13 हजार घर आगीत जळून झालीत खाक, पण तरीही हे एकमेव घर राहिलं शाबूत, चमत्कार पाहून संपूर्ण जग हादरतंय
लॉस एंजेलिसमधील आगीचा धिंगाणा आता संपूर्ण जगभर चर्चित राहिला आहे. या आगीने तेथील अनेक लोकांचा जीव घेतला तर अनेकांना बेघरही केले. या घटनेने फक्त अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जागाच हादरून निघत आहे. कारण आगीचा असा हा प्रलय आजवर कुणीही कधी पाहिला नाही. 7 जानेवारीपासून सुरू झालेली ही आग अद्याप शांत होण्याचं नावच घेत नाही आहे. अमेरिकेतील फायरब्रिगेड आपल्या जीवाचा आकांत करत ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी या आगीत आतापर्यंत हजारो टन पाणी ओतण्यात आले आहे मात्र तरीही ही आग काही शांत झालेली नाही. याहून उलट ती संपूर्ण शहरात आणखीन वेगात पसरत आहे.
माहितीनुसार, या आगीत आतापर्यंत 13 हजार घर जळून खाक झाली आहेत. मात्र यातही आता लक्षवेधी बाब ठरत असलेली गोष्ट म्हणजे, जिथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजची घर आगीत खाक होऊन गेली तिथेच एक घर आजची जशेच्या तशे शाबूत आहे. या घराच्या आजूबाजूचा परिसर, घरे जळून नष्टही झालीत मात्र हे घर पाहिल्याप्रमाणेच काहीही न होता वर मान उंचावत उभे आहे. अक्षरश: आगीचे लोळ या घरावर पडले पण या घराला काहीच झालं नाही. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या फार व्हायरल होत आहे.
बापरे! व्यक्तीने हातोडा घेतला अन् तब्बल 22 वेळा नाकात केले वार, Viral Video पाहून उडेल थरकाप
कुठे आहे हे घर?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे घर मालेबू या ठिकाणी आहे. खरंतर या परिसरात अनेक श्रीमंत उद्योजक आणि सेलिब्रिटींची घरे आहेत. पण हे घर वगळता त्यापैकी एकही घर राहिलं नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे? हे एकमेव घर कसे जाळण्यापासून शाबूत राहिले? चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
या घराच्या मालकाचे नाव डेव्हिड स्टायनर असे आहे. अमेरिकेतील घरं ही लाकडी प्लाय पासून तयार केली जातात. पण डेव्हिड यांनी दगडाचं घर बांधले आहे. शिवाय या घराची निर्मिती करताना भूकंप प्रतिरोधक टेक्नोलॉजी वापरली. या सोबतच घराचे छत हे फायरप्रूफ आहे. त्यामुळे आसपासची घरं जळत असताना या दुमजली इमारतीला काहीही झालं नाही. हे घर बांधण्यासाठी डेव्हिड यांनी जवळपास 67 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं जातेय. पण हे बांधकाम इतकं जबरदस्त आहे की जिथे संपूर्ण शहर जळतंय तिथे हे घर आपलं डोकं उंचावून हे सगळं दृश्य पाहत आहे. आगीचा झळाखा ता घराला काहीही करू शकत नाही.
Trash tycoon reveals how ‘miracle’ Malibu house survived wildfires when everyone else’s burned https://t.co/5cSYv0rV2p pic.twitter.com/gNVHmG04iV
— Daily Mail US (@DailyMail) January 11, 2025
शिकारीच झाला शिकार! काही सेकंदातच श्वानाने बिबट्याला टाकलं फाडून, मृत्यूचा थरार अन् Video Viral
या चमत्कारिक घराची पोस्ट @DailyMail नावाच्या एक्स अकाऊंटवरून करण्यात आली आहे. ही पोस्ट आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली असून फार वेगाने ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट्स करत या अविश्वसनीय घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अमेरिकन लोकांना केभ समजेल की तुम्हाला घर काँक्रीटमध्ये का बांधायचे आहे लाकडात नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा काही चमत्कार नाही.. हे आधुनिक साहित्याने बनवलेले घर आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.