शिकारीच झाला शिकार! काही सेकंदातच श्वानाने बिबट्याला टाकलं फाडून, मृत्यूचा थरार अन् Video Viral
बिबट्या जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याची दहशत फक्त जंगलातच नव्हे तर माणसांपर्यंतही पसरलेली आहे. बिबट्याला पाहतच लोकांच्या पायाखालची जमीन हादरते आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी उलटे पाय धरून पळू लागतात. तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. बिबट्याच्या थरारक शिकारीचे शिकारीचे व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एक अजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बिबट्या कोणत्या प्राण्याची नाही तर बिबट्याची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका श्वानाद्वारे बिबट्याची शिकार होत असल्याचे दृश्य दिसून आले. कुत्रा हा प्राणी खरंतर तितका धोकादायक नसून हा एक पाळीव प्राणी आहे. एका पाळीव प्राण्याद्वारे जंगलाच्या शिकाऱ्याची अशी शिकार होणे सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. व्हिडिओतील दृश्ये फार भयानक आहेत जी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही. बिबट्याचा मृत्यूचा हा खेळ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात खरंतर बिबट्याने शिकार करण्याच्या उद्देशाने कुत्र्यावर हल्ला केला. पण कुत्र्याला कमी लेखन बिबट्याला पुढे जाऊन चांगलाच महागात पडलं. त्याला कुत्र्याच्या ताकतीचा अंदाज त्याला लावला आला नाही आणि परिणामी तो स्वतःच त्याचा शिकार झाला. कुत्र्याने बिबट्याच्या पोटाचा चावा घेतला त्यामुळे त्याला हालचाल करणं कठीण झालं. तेवढ्यात या कुत्र्याचा साथिदार आला आणि त्यानं पाठीमागून हल्ला करून बिबट्याची उरलेली आशा सुद्धा संपवली. व्हिडिओच्या शेवटी कुत्रा बिबट्याला अक्षरशः फरफटत त्याची शिकार करत असल्याचे दिसून येते.
बाघ तेंदुआ का शिकारी पहाड़ी भोटिया कुत्ता, यह तो बांध कर रखा था वरना तेंदुए को फ़ाड़ कर रख देता। pic.twitter.com/RqimqnokxN
— bhUpi Panwar (@askbhupi) January 8, 2025
बिबट्याच्या शिकारीचा हा थरारक व्हिडिओ @askbhupi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत याशिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकाल कुत्र्यांना चांगलं अन्न मिळत आहे आणि बिबट्याची अवस्था बिकट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा बिबट्या जरा जास्तच लहान नाही का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.