
जंगलात चक्क 7 सापांशी खेळत होता तरुण तितक्यात एकाने काढला फणा अन्... काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अनेक नवनवीन प्रकार करू पाहतात. कधी जीवघेणे स्टंट्स, कधी डान्स तर कधी काही विचित्र गोष्टी करून लोक आपले व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतात. बऱ्याचदा हे व्हिडिओज व्हायरल देखील होतात. या व्हायरल व्हिडिओजमध्ये अनेकदा काही असे व्हिडिओ देखील असतात ज्यांना पाहून आपला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला हादरवून ठेवतात. सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरुण एक नाही दोन नाही तर चक्क सात सापांशी खेळताना दिसून येत आहे. मात्र हा खेळ त्याला नंतर चांगलाच महागात पडतो आणि नंतर काय होते ते आता तुम्हीच बघा.
सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुण एका जंगलात आपल्या पुढ्यात तब्बल सात सापांना घेऊन बसल्याचे दिसून येत आहे. साप हा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे. त्याच्या एका दंशाने तो कोणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो अशात तरुणाचे हे धाडस अनेकांना थक्क करणारे आहे. मात्र सापांचा हा खेळ तरुणाला महागात पडतो कारण यातील एक साप अचानक आपला फणा काढतो आणि थेट तरुणाचा कानावर चावा घेतो. सापाचा हा जीवघेणा हल्ला पाहून अनेकांना धक्का बसतो मात्र यावर तरुणाने जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण घनदाट जंगलात सात सापांना आपल्या पुढ्यात घेऊन बसला आहे. त्याने एकाच वेळी हातात हिरव्या आणि काळ्या रंगाच्या या सापांच्या शेपट्या धरून ठेवल्यात. त्यामुळे हे साप सुटका करून घेण्यासाठी फणा बाहेर काढून वळवळतायत; पण तो तरुण मात्र सापांना हातात रशी पकडल्याप्रमाणे घेऊन उभा राहत असतो. इतक्यात एक हिरव्या रंगाचा साप तरुणाच्या हातावर हल्ला करतो. त्यानंतर फणा वर करून थेट त्याच्या कानाला दंश करतो. हे दृश्य पाहून अनेकांना धडकी भरते मात्र व्हिडिओतील तरुण मात्र हे पाहून हसू लागतो. त्याच्या हसण्याचे कारण काही स्पष्ट नाही पण कदाचित हे साप बिनविषारी असावे ज्यामुळे दंश केल्यानंतरही तरुणाला कोणतीही भीती वाटत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @jejaksiaden नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले आहे, “तुमचे साप विषारी नाहीत का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊने सापांना पट्टा पकडल्यासारखे पकडले आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.