सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते त्याची एक डरकाळी ऐकून संपूर्ण जंगल हादरते, पण यात वाघिणीचे वर्चस्व देखील काही कमी नाही. तिची गर्जना ऐकून जंगल गुंजायला लागते. हा शिकारी इतका धोकादायक आहे की तो आपल्या शिकाऱ्याला पकडण्यासाठी क्षणाचाही वेळ घेत नाही. वाघाला मुळातच जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जाते. तुम्ही जंगलातील प्राण्यांमधील लढतीचे अनेक रंजक व्हिडिओज कधी ना कधी सोशल मीडियावर पाहिले असतील मात्र तुम्ही कधी जंगलातील दोन वाघांची झुंज कधी पाहिली आहे का? नाही तर आज अशाच एका धोकादायक लढतीचा व्हिडिओ समोर आला आहे. यातील थरारक लढत पाहून तुम्ही थरथर कापू लागाल.
वाघाला आपला प्रदेश इतर कोणत्याही वाघाने अतिक्रमण करू नये असे अनेकदा सांगितले जाते. यामुळेच वाघांना त्यांच्या हद्दीत इतर कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही. असे झाले तर वाघ आपापसात भांडू लागतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. यात दोन वाघीण एकमेकींना टक्कर देत भयंकर झुंज देताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये दोन्ही वाघ आपापसात भांडताना दिसत आहेत. 12 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दोन्ही वाघ एकमेकांवर हल्ला करत असल्याचे पाहू शकता. त्या दोघांची गर्जना ऐकून तुम्ही कल्पना करू शकता की ते किती रागावलेले आहेत आणि किती जीवघेणे भांडत आहेत. लढाई दरम्यान, त्याची गर्जना खूप जोरात असते, जी समोरून ऐकणाऱ्या कोणालाही घाबरवते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आम्ही तुम्हाला सांगतो की, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांच्या तुंबळ मारामारीचा हा एक जुना व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. यात दोन वाघ आपल्या जिवाच्या आकांताने थरारक लढत देताना दिसून येत आहेत. एकमेकांना भलेमोठे पंजे, लाथाबुक्के मारल्यानंतर शेवटी हे दोघेही आपले युद्ध तिथेच थांबतात आणि आपापल्या वाटेला निघून जातात. त्यांची ही लढत फार कमी काळ जरी टिकली असली तरी लोकांनी मात्र या व्हिडिओची फार मजा लुटली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वाघांच्या या लढतीचा व्हिडिओ @ranthambhorepark नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहासनाचा खेळ’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 40 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती प्रदीर्घ लढत होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओएमजी, एक आश्चर्यकारक दृश्य” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे ताडोबाचे आहे, रणथंबोरचे नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






