Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश

Ganeshotsav 2026: मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १८९६ मध्ये झाली असून यंदा मंडळाचे १३१ वे वर्ष आहे. दीर्घ परंपरा असलेल्या या मंडळाकडून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करणारे संदेश देण्यावर भर दिला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 02:35 AM
मेहुणपुरा गणेश मंडळाचा सामाजिक संदेश

मेहुणपुरा गणेश मंडळाचा सामाजिक संदेश

Follow Us
Follow Us:
  • स्क्रीन टाइम घटवा, व्यसनांपासून दूर राहा
  • मेहुणपुरा मंडळाचा सामाजिक संदेश
  • पुण्यात गणेशोत्सवासाठी अलोट गर्दी 
पुणे/Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्याची परंपरा कायम ठेवत शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा तरुणाईला (Pune) स्क्रीनच्या अतिवापरापासून तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. मंडळाच्या विविध उपक्रम आणि संदेशांमधून ‘मोबाईलच्या आभासी जगापेक्षा प्रत्यक्ष आयुष्याला वेळ द्या’, तसेच ‘नशेपासून दूर राहा’ असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या यंदाच्या संदेशांमध्ये ‘स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा’ हा विशेष लक्षवेधी संदेश देण्यात आला आहे. सध्याच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये वाढत चाललेला वेळ लक्षात घेता, तरुणांनी स्क्रीनसमोरचा अनावश्यक वेळ कमी करून शिक्षण, कला, क्रीडा, छंद आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादासाठी वेळ द्यावा, असा संदेश यातून देण्यात आला आहे. ‘स्क्रीनमध्ये हरवू नका, खऱ्या जगापासून दुरावू नका!’ या आवाहनातून डिजिटल जगाच्या अतिवापराचे परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

याचबरोबर मंडळाने व्यसनमुक्तीचाही मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. ‘संयम ठेवा, नशेला दूर करा, यशाच्या वाटेवर पुढे चला!’, तसेच ‘नशे से दूरी, बाप्पा से यारी, बस इतनी सी बात है प्यारी!’ अशा संदेशांद्वारे अमली पदार्थ आणि अन्य व्यसनांपासून तरुणांनी दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक आणि तरुण मंडळाच्या परिसरात येत असल्याने सामाजिक विषयांवरील हे संदेश प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.

मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १८९६ मध्ये झाली असून यंदा मंडळाचे १३१ वे वर्ष आहे. दीर्घ परंपरा असलेल्या या मंडळाकडून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करणारे संदेश देण्यावर भर दिला जात आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन वसंतराव शिंदे, उपाध्यक्ष अनंत महादेव कावणकर, सचिव पराग शशिकांत ठाकूर, तर उत्सव प्रमुख संतोष शशिकांत कोलांबडे आहेत. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि जय गणेश व्यासपीठ यांच्या सहकार्याने सामाजिक संदेश देण्यात येत आहेत.

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

मेहुणपुरा मंडळाचे संदेश 

– स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा
– स्क्रीनमध्ये हरवू नका, खऱ्या जगापासून दुरावू नका
– संयम ठेवा, नशेला दूर करा
– नशेपासून दूर राहा, बाप्पाशी नाते जोडा

Web Title: Mehnupura ganesh mandal appeal to increase dream time and less screen time social meesage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
1

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण
3

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
4

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.