मुंबई (Mumbai). मुंबईतील लोढा प्रिमिएरो सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने तेथील रहिवाशांसाठी कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
सुराना ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या लसीकरण अभियानात वसाहतीतील सुमारे ४०० रहिवाशांना लस दिली जाणार आहे. या अभियानाबाबत समाधान व्यक्त करून कोविड १९ बाबतचे सर्व नियम पाळण्याची सूचना ठाकरे यांनी यावेळी केली. माजी मंत्री सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.