Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?”; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संतप्त सवाल

गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिक आंदोलन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2024 | 04:47 PM
''... दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?''; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संतप्त सवाल

''... दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?''; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या बदलापूर येथे मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली आहे. बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले, शेकडो नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूकही रोखून धरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा मागील पाच तासांपासून ठप्प झाली. सकाळपासून संतप्त नागरिकांनी आरोपीला आजच्या आज फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली. दरम्यान सरकारच्या वतीने संकटमोचक अशी ओळख असलेली मंत्री गिरीश महाजन हे स्थानकावर दाखल झाले आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूर येथील शाळेत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हणाले, ”बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या.”

बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या… — Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024

गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिक आंदोलन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र त्यांना यश मिळताना दिसत नाहीये. दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांशी बोलत असून, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत आहेत. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन दिले जात आहे. मात्र आंदोलक आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत.

Web Title: Mns chief raj thakceray ask question police for badlapaur minor girl abuse case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • badlapur crime news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.