Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी छटपूजा रोखून दाखवावी’; गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा, छटपूजा वादात नवा ट्विस्ट!

Gunratna Sadavarte : मुंबईतील छटपूजेवरून राजकीय वातावरण तापले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत १५ नोव्हेंबरला छटपूजा रोखून दाखवण्याचे खुले आव्हान दिले.

  • By विवेक
Updated On: Nov 13, 2026 | 10:19 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:
  • छटपूजेवरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
  • छटपूजेच्या मुद्द्यावरून सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
 

मुंबई : छटपूजेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दोन्ही नेते रसातळाला गेलेलं राजकारण करत असल्याची टीका करत त्यांनी १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत छटपूजा होणारच, असा ठाम दावा केला आहे. (Gunratna Sadavarte)

छटपूजा आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांना विरोध करण्यावरून सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. ‘हे बालक आहेत, यांना बालकच म्हणावं लागेल’, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली. सण-उत्सवांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याऐवजी लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

भोजपुरी गाण्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना सुनावलं

रेल्वेमध्ये भोजपुरी गाणी का वाजवली जातात, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही सदावर्ते यांनी सुनावले. उत्सवी गाण्यांना डान्स बारमधील गाणी म्हणणे ही सांस्कृतिक दिवाळखोरी असल्याचे ते म्हणाले.

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

बिहारी असल्यामुळे एखाद्याचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी बिहार विमानतळावर छटपूजेची गाणी वाजवली जात असल्याचाही दाखला दिला.

सदावर्ते यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आहे. १५ नोव्हेंबरला जिथे छटपूजा सुरू असेल तिथे येऊन ती रोखून दाखवा, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे छटपूजा थांबणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

छटपूजेला विरोध करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, कलकत्ता न्यायालयाने छटपूजेला परवानगी दिल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारनेही आवश्यक परवानगी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एकच असल्याचेही ते म्हणाले.

आता सदावर्ते यांच्या या आव्हानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. छटपूजेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का केली?

    Ans: मुंबईतील छटपूजेला होणाऱ्या कथित विरोधाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली आणि धार्मिक कार्यक्रमांना विरोध करू नये, अशी भूमिका मांडली.

  • Que: मुंबईत छटपूजा कधी होणार असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला?

    Ans: १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत छटपूजा होणार असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

  • Que: गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे कोणती मागणी केली?

    Ans: छटपूजेला विरोध करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगत त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: Gunratna sadavarte chhath puja raj thackeray uddhav thackeray mumbai vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • Chhath Puja
  • Gunratna Sadawarte
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chhath Puja Controversy: उल्हासनगरमध्ये छटपूजेवरून राजकारण तापणार! गणपती विसर्जनाला विरोध, मग छटपूजेला परवानगी कशी?
1

Chhath Puja Controversy: उल्हासनगरमध्ये छटपूजेवरून राजकारण तापणार! गणपती विसर्जनाला विरोध, मग छटपूजेला परवानगी कशी?

Chhath Puja: रामायण आणि महाभारतातही आहे छठ पूजेचा उल्लेख? जाणून घ्या पौराणिक इतिहास
2

Chhath Puja: रामायण आणि महाभारतातही आहे छठ पूजेचा उल्लेख? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Chhath Puja 2026 School Holiday: बिहार-झारखंडच नाहीतर, छठ पूजेनिमित्त ‘या’ राज्यांतही शाळांना सुट्टी! पाहा संपूर्ण यादी
3

Chhath Puja 2026 School Holiday: बिहार-झारखंडच नाहीतर, छठ पूजेनिमित्त ‘या’ राज्यांतही शाळांना सुट्टी! पाहा संपूर्ण यादी

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण
4

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.