Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gulabi Movie : विचारांच्या, वागणुकीच्या, स्वप्नांच्या आणि नात्यांच्या ‘गुलाबी’ प्रवासाची तारीख ठरली

'बाईपण भारी देवा', 'नाच गं घुमा', 'झिम्मा', 'झिम्मा २' या स्त्रीप्रधान चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. 'गुलाबी' असं या चित्रपटाचं नाव असून येत्या २२ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 16, 2024 | 02:39 PM
प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई...

प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई...

Follow Us
Follow Us:

Gulabi Movie Released Date : मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या अनेक महिला प्रधान चित्रपटांवर काम केले जात आहे. अनेक स्त्रीप्रधान चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरीदेखील केली. या यादीमध्ये, ‘बाईपण भारी देवा’, ‘नाच गं घुमा’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका सिनेमाची भर पडली आहे. ‘गुलाबी’ असं या चित्रपटाचं नाव असून येत्या २२ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हे देखील वाचा – ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या शुटिंगला सुरुवात, नवीन कलाकारांसोबत रंगणार मैफल

व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत चित्रपटाचा काही तासांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत एक रिलीज डेट शेअर करण्यात आली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी या तिघिही मैत्रीणी दाखवल्या आहेत. ह्या मैत्रीणी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी त्यांची भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून त्या तारखेला प्रेक्षकांनाही ‘गुलाबी’ चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे. विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार हे नक्की!

 

निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून ‘गुलाबी’ चित्रपटाची सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली आहे. व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. तर प्रमुख भूमिकेत श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.

हे देखील वाचा – आदिती राव आणि सिद्धार्थ अडकले एकमेकांच्या बंधनात, ४०० वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न!

‘गुलाबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले की, “आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात ‘गुलाबी’ चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील. ‘गुलाबी’ हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील.”

Web Title: Mrinal kulkarni ashwini bhave and shruti marathe shares upcoming marathi movie gulaabi poster and released date on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 02:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.