A R Rahman Hospitalized : संगीतकार ए आर रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; नेमकं काय झालं होतं?
प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए.आर.रहमान यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकाराला रविवारी सकाळी चेन्नईतल्या ग्रीम्स रोडवरील अपोलो हॉस्पिटलमधील आपात्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर ईसीजी आणि इकोकार्डियोग्रामसह अनेक चाचण्याही करण्यात आल्या. आज रेहमान यांची अँजिओग्राम चाचणी देखील केली जाण्याची शक्यता आहे.
‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
संगीतकार ए.आर.रेहमान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आजच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना गेल्या काही दिवसांमधील प्रवासामुळे डिहायड्रेशन आणि मानेचे दुखण्याशी संबंधित काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती. आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती ए.आर.रेहमान यांच्या टीमने दिली आहे. त्यासोबतच ए.आर.रेहमान यांच्या टीमने अशीही माहिती दिली की, सध्या रोझाचे उपवास सुरु असल्यामुळे रहमान यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.
नुकताच ए.आर. रहमान यांनी ब्रिटिश गायक गायक एड शीरन सोबत चेन्नईमध्ये लाइव्ह गाणे गायले होते. चेन्नईतील वायएमसीए ग्राउंडवर ब्रिटिश गायक एड शीरनचा म्युझिक इव्हेंट पार पडला. यामध्ये त्यांनी त्यांची प्रसिद्ध गाणी गायली. दरम्यान, रहमान एड शीरनच्या मंचावर आल्यावर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने त्याचे ‘उर्वशी उर्वशी’ हे हिट गाणे गायले. एड शीरननेही गिटार वाजवून त्याच्यासोबत काम केले. या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एड शीरन म्हणाले की, ‘रहमानसोबत परफॉर्म करणे हा त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’ आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
होळीच्या पार्टीत प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचा विनयभंग; सहकलाकाराविरूद्ध दाखल केली तक्रार
दरम्यान, ए.आर.रहमान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटस्फोट झाला आहे. दोघांनी २९ वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी १९९५ साली लग्न केले होते आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.