Aditi Pohankar recalled incident where she faced Sexual Harassment
सध्या देशातील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या सातत्याने कानावर येत आहे. आता सामान्य महिलांप्रमाणे काही सेलिब्रिटी महिलांनाही या दुर्दैवी घटनेचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील वाईट अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीने सांगितलेला अनुभव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अदिती पोहनकर हिला तिच्या आयुष्यातील वाईट अनुभव आला आहे. तिने ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत देत हा किस्सा आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. या मुलाखतीमध्ये तिने सांगितलेला अनुभव ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
“दादर स्थानकाहून मी एकदा लोकलमधून प्रवास करत होते. मी फर्स्टक्लासच्या डब्ब्यात चढले. महिलांच्या फर्स्ट क्लास डब्ब्यामध्ये काही लहान मुलंही चढली होती. महिलांच्या डब्ब्यांमध्ये छोट्या शाळकरी मुलांनी आलेलं चालतं. त्यावेळी मी साधारणतः अकरावीत शिकत होते. माझ्यासमोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली, तसा त्याने माझ्या छातीला हात लावला. ही घटना भरदिवसा सकाळी अकरा वाजता माझ्यासोबत घडली होती.” असं मुलाखतीमध्ये आदिती पोहनकर म्हणाली.
“ज्यावेळी माझ्यासोबत ही घटना घडली होती, त्यावेळी मी कुर्ता घातला होता. असंही नव्हतं की, मी त्यावेळी काही विचित्र कपडे घातले होते. समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्याची विचित्र विचारधारा पाहून मला धक्काच बसला. ही घटना घडल्यानंतर मी लगेचच पुढच्याच स्टेशनला उतरले आणि पोलिस स्थानकात गेले. पण, त्यावेळी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रियाही मला शॉकिंग करणारी होती. “काही झालं नाही ना तुम्हाला, आता कुठे त्याला शोधणार?”, असं म्हणत पोलिसांनी मला उडवून लावलं. तेवढ्यात पोलीस स्टेशनजवळच तो मुलगा मला पुन्हा दिसला. मी ज्यावेळी त्याला पाहिलं, तेव्हा तो दुसऱ्या मुलीसोबत तसाच काहीसा प्रकार करण्याच्या तयारीत होता.”, असं अदितीनं सांगितलं.
“मी त्याला ओळखलं… मी पोलिसांना जाऊन सांगितलं की, हाच तो मुलगा… पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नानं पुन्हा एकदा मला धक्का बसला. पोलिसांनी माझ्याकडे पुरावा मागितला. मी विचारलं, पुरावा कशाला हवा? त्यानं माझ्यासोबत ते कृत्य केलंय म्हटल्यावर मला माहीत असणारच ना… मी वैतागल्यावर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल माझ्यासोबत आली. तिनं त्या मुलाला जाब विचारला. तर त्या मुलानं आपण असं काहीच केलेलं नाही, असं सांगत स्पष्ट नकार दिला. त्यावेळी तिथेच माझ्यात दुर्गा संचारल्यासारखं झालं. मी त्याच्यावर जोरात ओरडले. माझ्या आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच ‘हो हो, मी केलं’ असं म्हणाला. मी त्याची कॉलर पकडली आणि ‘परत कोणासोबत करशील?’ असं विचारलं. त्याला पोलिसांकडे दिलं. मी त्याच्यावर ओरडले नसते तर त्याने मान्यच केलं नसतं.”
‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे केला साखरपुढा, हटके अंदाजात गर्लफ्रेंडला केले प्रपोज!