Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बागेश्वर महाराजचे ‘चमत्कार’ पाहून भारावली मुस्लिम महिला! म्हणाली, मी हिंदू धर्म स्वीकारणार

महिलेने सांगितले की, सनातन धर्म सर्वोत्तम आहे कारण पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही. महिलेचे म्हणणे ऐकून मंचावर उपस्थित लोकांनी बाबांचा जयजयकार सुरू केला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 22, 2023 | 03:20 PM
बागेश्वर महाराजचे ‘चमत्कार’ पाहून भारावली मुस्लिम महिला! म्हणाली, मी हिंदू धर्म स्वीकारणार
Follow Us
Close
Follow Us:

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सध्या बागेश्वर धाम (Bageshwar Dham) कथा सप्ताह सुरू आहे. वादानंतर बागेश्वर महाराज (Bageshwar Mahara)चांगलेच चर्चेत  आले आहे. शनिवारी पुन्हा एकदा बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबार आयोजीत करण्यात आला होता. या दैवी दरबारात एका एका मुस्लिम महिलेने बाबांचा चमत्कार पाहून प्रभावित झाली आणि तिने मंचावरूनच हिंदू धर्म स्वीकारल्याची घोषणा केली.सनातन धर्म सर्वश्रेष्ठ असून, हिंदू धर्मात भाऊ-बहिणीचे लग्न होत नाही. हा धर्म आणि सभ्यता असलेला समाज आहे.

[read_also content=”वयाच्या 93 व्या वर्षी चौथं लग्न; पत्नी 30 वर्षांनी लहान, चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील दुसऱ्या व्यक्ती चढला बोहल्यावर! https://www.navarashtra.com/world/buzz-aldrin-has-married-for-the-fourth-time-at-the-age-of-93-nrps-363620.html”]

सुलताना असे या महिलेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बिलासपूर येथील रहिवासी आहे. महिलेने सांगितले की, सनातन धर्म सर्वोत्तम आहे कारण पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही. महिलेचे म्हणणे ऐकून मंचावर उपस्थित लोकांनी बाबांचा जयजयकार सुरू केला. महिलेने बाबांच्या दैवी दरबारात अर्ज केला होता. बाबांनी पुन्हा एकदा महिलेची समस्या तिला न सांगता कागदावर लिहून दिली. बाबांचा हा चमत्कार पाहून ती प्रभावित झाली आणि तिने हिंदु धर्म स्वीकारण्याच निर्णय घेतला.

तीन जणांनी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारण्याची व्यक्त केली इच्छा

बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra shastri)  यांच्या दैवी दरबारात शनिवारी ओडिशातील तिघांनी हिंदू धर्मात परतल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, आम्ही इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारण्याची घोषणा करतो. बागेश्वर महाराज यांनी मंचावरूनच सर्वांचे स्वागत केले. तत्पूर्वी दिव्य दरबारात महाराजांनी अनेक भक्तांचे अर्ज ऐकले. त्यांच्या समस्या न विचारता त्या आधीच कागदावर लिहून त्या सोडवण्यासाठी बागेश्वर बाबांवर विश्वास ठेवण्यास सांगितले.

अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होता

नागपुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव () यांनी बागेश्वर महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. माझ्या आव्हानाच्या दोन दिवस आधी महाराज येथून पळून गेले, असा आरोप केला. या आव्हानाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी रायपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. आव्हान स्वीकारताना ते म्हणाले होते की, आरोप करणाऱ्यांचे रायपूरमध्ये स्वागत आहे. मी दैवी दरबारात उत्तर देईन.

रायपूरमध्ये देण्यात आला लाईव्ह डेमो

याआधी शुक्रवारी बागेश्वर धाम सरकारने पत्रकारांना आपल्या सिद्ध शक्तीचा लाईव्ह डेमो दिला होता. त्यांनी मंचावरून एका पत्रकाराचे नाव पुकारले. त्यानंतर त्यांनी भाऊ आणि भाचीशी संबंधित माहिती सर्वांसमोर ठेवली होती. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Web Title: Muslim women decided to convert in hindu religion as she impressd by bageshwar maharaj miracle nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2023 | 03:17 PM

Topics:  

  • Bageshwar Dham
  • Chattisgarh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.