
नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत. असंच काहीसं चित्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातसुद्धा बघायला मिळाले. नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर संतप्त शिवसैनीकांनी संगमनेर बस स्थानकातील सुलभ शौचालया नारायण राणे यांचे नामकरण केले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या वक्तव्या विरोधात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद व्हावी असे निवेदन पोलिसांना देण्यात आलं. या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले.
काय म्हणाले राणे
“मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं हे वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. रायगडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणेंची जीभ घसरली आणि राज्यात राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष सुरु झाला आहे.