
दिल्ली बॉम्ब स्फोटात 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे
केंद्रीय आरोग्य विभागाने केली मोठी कारवाई
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीत भीषण स्फोट झाला. लाल किल्ल्याजवलील मेट्रो स्टेशन परिसरात हा स्फोट झाला. यामध्ये 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेले दहशतवादी हे डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. त्यावर आता केंद्रीय आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या तीन डॉक्टरांवर केंद्रीय आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यांचे डॉक्टरी पेशाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर वैद्यकीय परिषदेच्या शिफारशीनंतर आणि तपास संस्थांनी गोला केलेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आज याबाबतचा एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार दिल्ली बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या डॉक्टरांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेले डॉक्टर हे जम्मू काश्मीर कौन्सिलमध्ये नोंदणीकृत होते. जम्मू काश्मीर आरोग्य विभागाने आपल्या अधिकारांचा वापर करून डॉक्टरांचे परवाने रद्द केले आहेत.
अमित शहा अॅक्शन मोडमध्ये
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्लाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसाह एक बैठक घेतली.
दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे समजल्यानंतर केंद्र सरकार कोणते पाऊल उचलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
Delhi Bomb Blast : अमित शहा अॅक्शन मोडमध्ये; दौरा रद्द करत घेतली ‘ही’ सीक्रेट मीटिंग
या बैठकीत या घटनेच्या तपासाबाबत आढावा घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरात दौऱ्यावर जाणार होते. मात्र दिल्लीतील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी आपला गुजरात दौरा रद्द केला आहे. यामध्ये एनआयएचे प्रमुख, आयबीचे प्रमुख, गृह सचिव आणि दिल्ली पोलिस कमिश्नर बैठकीला उपस्थित होते.