अमित शहा यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक (फोटो- टीम नवराष्ट्र)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
दिल्लीत झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला म्हणून जाहीर
सुरक्षा यंत्रणांसोबत शहा यांनी घेतली बैठक
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्लाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसाह एक बैठक घेतली.
दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे समजल्यानंतर केंद्र सरकार कोणते पाऊल उचलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत या घटनेच्या तपासाबाबत आढावा घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरात दौऱ्यावर जाणार होते. मात्र दिल्लीतील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी आपला गुजरात दौरा रद्द केला आहे. यामध्ये एनआयएचे प्रमुख, आयबीचे प्रमुख, गृह सचिव आणि दिल्ली पोलिस कमिश्नर बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशातील सुरक्षेचा आढावा घेतला. कालच भुतान दौऱ्यावरून परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी रूग्णालयात जाऊन जखमी लोकांची विचारपूरस केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेतील दोषी आरोपीना सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान
दिल्लीतील घटनेनंतर मध्यपूर्वेतील प्रमुख देश सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई), इराण, कतार आणि मालदीव यांनी भारतीय जनतेप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली आहे. दहशतवादाच्या विरोधात उभे राहत त्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. हे भारतासाठी केवळ राजनैतिक पाठबळ नाही, तर जगभरातून मानवतेचा संदेश देणारे उदाहरण ठरले आहे.
Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेनंतर त्वरित निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की,“युएई सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दहशतवादाच्या कृत्यांचा तीव्र निषेध करते. या गुन्हेगारी हल्ल्याचा उद्देश भारतातील स्थैर्य आणि शांततेला धक्का देणे आहे, आणि आम्ही अशा कृतींचा स्पष्ट शब्दांत विरोध करतो.”






