अमरावती (Amravati). मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विदर्भात उद्भवलेल्या या परिस्थितीनंतर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.
[read_also content=”भंडारा/ पाऊस तर बरसला; पण धानाच्या रोवण्या रखडल्या https://www.navarashtra.com/latest-news/bhandara-it-rained-but-the-grain-stalks-stagnated-nrat-160782.html”]
पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी नवनीत राणा यांनी चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले.
मुख्यमंत्र्यांना टोला
खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पहावी. तसेच स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समर जाणून घ्याव्यात. जोपर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं? मदत कशी दिली जाणार, असा प्रश्न थेट खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.