Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VHP च्या ‘त्या’ गरबा विधानाने पेटला वाद; NCP प्रवक्ते म्हणाले, “मुस्लिमांचे असे अनेक सण…”

विश्व हिंदू परिषदेने गरब्याबाबत एक विधान केले होते. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आक्षेप घेतला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2025 | 07:05 PM
VHP च्या ‘त्या’ गरबा विधानाने पेटला वाद; NCP प्रवक्ते म्हणाले, “मुस्लिमांचे असे अनेक सण…”
Follow Us
Close
Follow Us:

विश्व हिंदू परिषदेच्या विधानाने निर्माण झाला वाद 
व्हीएचपीच्या विधानावर राष्ट्रवादी कॉँग्रेसची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

Ajit Pawar NCP On VHP: ‘गरबा’ कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जावा. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना टाळण्यासाठी प्रवेश करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड तपासणी करण्याचा सल्लाही आयोजकांना देण्यात आला होता. गरबा हा पूजेचाच एक भाग असून तो केवळ नृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही, असेही VHP ने म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावर भाष्य केले आहे. धर्माच्या नावाखाली कोणाला त्रास योग्य नाही, असे परांजपे म्हणाले आहेत.

आजपासून नवरात्र सुरू झाले आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक नागरिक नवरात्रीमध्ये गरबा/दांडिया खेळण्यासाठी जात असतात. नुकतेच विश्व हिंदू परिषदेने याबाबत एक विधान केले होते. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आक्षेप घेतला होता. आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे?

विश्व हिंदू परिषदेच्या गरबा विधानाने वाद पेटला आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले, “धर्माच्या नावाखाली कोणाला त्रास देणे योग्य नाही.

Mumbai, Maharashtra: Reacting to the ban on the entry of Muslims in garba pandals, NCP former MP and National Spokesperson, Anand Paranjpe says, "Specifically regarding Maharashtra, the state government can make decisions, but it is not right to harass anyone in the name of… pic.twitter.com/QEzWoOrVLR — IANS (@ians_india) September 22, 2025

मुस्लिमांचे असे अनेक सण आहेत, ज्यात हिंदू सहभागी होतात. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, यावर महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल.  गरबा खेळताना महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिस अवशयक तयारी करतील. मात्र या धर्माच्या लोकांनी गरबा खेळायला येऊ नये, किंवा त्यांचा धर्म विचारला जाणे योग्य नाही.”

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…

विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. VHP च्या या भूमिकेवर रामदास आठवले यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘मी याचा तीव्र निषेध करतो! गरबा कार्यक्रमात कोण जाईल आणि कोण नाही, हे ठरवणारे विश्व हिंदू परिषद कोण?’ हा सल्ला फक्त आयोजकांना सूचना देण्यापुरता मर्यादित नाही, तर काही कट्टरपंथीयांना हिंसा भडकवण्याचे आणि बळाचा वापर करण्याचे खुले निमंत्रण आहे.”

 

Web Title: Ncp leader anand paranjape reply vhp garba controversial statement maharashtra politics navratri 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Vishva Hindu Parishad

संबंधित बातम्या

पूनम पांडे मंदोदरीच्या भूमिकेत? हिंदू संघटनांचा संताप
1

पूनम पांडे मंदोदरीच्या भूमिकेत? हिंदू संघटनांचा संताप

नागपूर हिंसाचार प्रकरणात विहिंपचा मोठा आरोप, “आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन अजूनही… “
2

नागपूर हिंसाचार प्रकरणात विहिंपचा मोठा आरोप, “आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन अजूनही… “

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.