Ramdas Athawale (Photo Credit- X)
Ramdas Athawale On VHP: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. नवरात्रीमध्ये होणाऱ्या ‘गरबा’ कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याच्या VHP च्या भूमिकेचा त्यांनी कडाडून विरोध केला असून, असे आवाहन ‘हिंसेला निमंत्रण’ देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेने (VHP) शनिवारी म्हटले होते की, ‘गरबा’ कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जावा. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना टाळण्यासाठी प्रवेश करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड तपासणी करण्याचा सल्लाही आयोजकांना देण्यात आला होता. गरबा हा पूजेचाच एक भाग असून तो केवळ नृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही, असेही VHP ने म्हटले होते.
VHP च्या या भूमिकेवर रामदास आठवले यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘मी याचा तीव्र निषेध करतो! गरबा कार्यक्रमात कोण जाईल आणि कोण नाही, हे ठरवणारे विश्व हिंदू परिषद कोण?’
मैं कड़ी निंदा करता हूँ! विश्व हिंदू परिषद कौन होती है तय करने वाली कि गरबा में कौन जाएगा और कौन नहीं?#SayNoToDiscrimination #Navratri2025 #VHPControversy #GarbaForAll
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2025
Mahayuti: “भाजपकडून जागा न मिळाल्यास…”; आगामी निवडणुकीवरून आठवलेंचा महायुतीला इशारा
आठवले पुढे म्हणाले, “हा सल्ला फक्त आयोजकांना सूचना देण्यापुरता मर्यादित नाही, तर काही कट्टरपंथीयांना हिंसा भडकवण्याचे आणि बळाचा वापर करण्याचे खुले निमंत्रण आहे.” केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी सांगितले की, “जर या सल्ल्यामुळे नवरात्रीदरम्यान देशात कुठेही संघर्ष, हल्ला किंवा धार्मिक वाद झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी VHP आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची असेल.”
सरकार और प्रशासन को तुरंत कार्रवाई करते हुए यह सुनिश्चित करना चाहिए कि गरबा और डांडिया आयोजकों को पूरी सुरक्षा मिले। किसी भी प्रकार की जबरदस्ती, पहचान की चेकिंग या धार्मिक भेदभाव की कोशिशों को कानून के तहत सख़्ती से रोका जाए। नवरात्रि सबकी है – इसमें किसी की आस्था का अपमान नहीं,…
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2025
गरबा हा पूजा आणि आनंदाचा सण आहे, तो द्वेष आणि संशयाचे व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही आठवले यांनी म्हटले. अशा प्रकारच्या कृती भारताची एकता, विविधता आणि धार्मिक सहिष्णुतेवर हल्ला करतात, असेही आठवले म्हणाले.