Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत शिवसेना शहरप्रमुखाची बार समोर हत्या; असा होता गेम प्लॅन, वाचा सविस्तर

शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख ३४ वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. तिवसा शहरातून जाणाऱ्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 27, 2021 | 02:49 PM
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत शिवसेना शहरप्रमुखाची बार समोर हत्या; असा होता गेम प्लॅन, वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या शिवसेना शहरप्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर रात्री ५ जणांनी शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख ३४ वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. तिवसा शहरातून जाणाऱ्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी पाच जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची हत्या केली. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून ५ आरोपींनी अमोल पाटील यांच्यावर हल्ला चढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

[read_also content=”काय म्हणता राव! पूर्ण होईल Slim and Trim होण्याचं स्वप्न; आता झोपूनच घटवा वजन https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/health-tips-sleep-and-weight-loss-sleep-helps-for-lose-weight-nrvb-147773/”]

या घटनेचं वृत्त वार्‍यासारखं शहरात पसरलं. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रिता ऊईके यांनी तातडीने तपास हाती घेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत ४ आरोपींना अटक केली. तर १ आरोपी फरार आहे. संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रविण रामदास ढोबाळे, प्रविण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३०) आणि रुपेश घागरे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण तिवसा शहरातील रहिवाशी आहेत.

ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे. अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला या प्रकरणांमध्ये अटकही करण्यात आली होती. कट रचून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी अविनाश पांडे यांनी आशीर्वाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मयत अमोल पाटील याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपारीचा आदेश देखील काढला होता.

Web Title: Near amravati nagpur national highway shiv sena city chief amol patil murdered in tivsa of amravati district nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2021 | 02:49 PM

Topics:  

  • Amravati District
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
1

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही
2

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी
3

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न
4

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.