Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2026 | 07:00 PM
ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षांतर

ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षांतर

Follow Us
Follow Us:
  • उबाठा गटाला मोठा धक्का!
  • राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांची शिंदेंना साथ
  • उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
ठाणे : उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या पक्ष सोहळ्यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (Shiv Sena)

उपमुख्यमंत्री म्हणाले की गेली अनेक वर्ष दुबे यांना शिवसेनेते काम करताना पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या कार्यकर्त्याने आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मोर्य, दशरत प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण केले. महाराष्ट्राला अडीच वर्षात पुढे नेण्याचे काम केले. महाराष्ट्राला विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन गेलो. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप सहकार्य लाभले. या सर्व कार्यकाळात आम्ही महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन गेलो. आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, असे ते म्हणाले. या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षातील लोक आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.

Breaking Delhi Police Detained CJP Abhijeet Dipke: आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

ते पुढे म्हणाले की, दुबे यांना शिवसेनेच्या कार्यपद्धती माहित आहे. राहुल कनाल दुबे यांच्या कायम संपर्कात होते. दुबे यांनी योग्य पक्षात प्रवेश केला आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुबे यांनी राष्ट्र प्रथमची भूमिका घेतली. हीच भूमिका बाळासाहेबांची होती आणि आज मोदीजींची सुद्धा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर शिवसेना विविध राज्यांमध्ये काम करत आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या विस्तारासाठी आनंद दुबे आणि त्यांची टीम काम करेल, असे ते म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सचिन सानप हा मूळचा शिवसेनेचा आहे. पुणे शिक्षक मतदार संघात सचिन सानप याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथं महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल. इतर चारही ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवतोय आणि काम करतोय. विधान परिषद निवडणुकीत पाचही ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांकडून संविधानिक संस्थांवर प्रहार करण्याचे काम

विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत आंदोलन करतात. या आंदोलकांमागे परकीय शक्तींचा हात किंवा सहभाग दिसतो. विरोधकांना देशात अशांतता पसरवायची आहे. अराजकता पसरवायची आहे. ते नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेचे उदाहरण देतात हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांचा अपमान करण्याचे काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन राहुल गांधी संविधानविरोधी काम करत आहेत.

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयावर या व्यवस्थांवर ते प्रहार करत आहेत. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मात्र देशातील १४० कोटी जनता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला फसणार नाहीत. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे इथली जनता पूर्ण होऊ देणार नाही. राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा करणे हे दुर्देवी आहे. त्यांनी देश जोडण्याची भाषा करावी. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम राहुल गांधी आणि इंडि आघाडीने केले त्याला कोर्टाने फटकारले, असे ते म्हणाले.

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Web Title: Uddhav thackeray shiv sena spokesperson anand dubey joins eknath shinde shiv sena sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
1

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
2

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
3

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
4

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.