ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला लक्ष्मण हाके भाडोत्री माणूस; शिंदे गटाच्या नेत्याची टीका
सांगली : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. लवकरच विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळे आरक्षण ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी आग्रही आहेत. मात्र ओबीसी आरक्षण वाचवण्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरांगे पाटील या दोन्ही नेत्यांच्या रॅली व सभा आहेत. सांगलीमध्ये लक्ष्मण हाके यांचा महाएल्गार मेळावा आहे तर पुण्यामध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली आहे.
लक्ष्मण हाके यांनी यापूर्वी देखील ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र दौरा करत ते ओबीसी समाज एकवटण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्यांचा सांगलीमध्ये दौरा असून ते सभा घेणार आहे. दुपारी 2 वाजता हा मेळावा सुरू होणार आहे. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी आरक्षण बचाव, महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवर हा महाएल्गार मेळावा होणार असून यासाठी लाखो ओबीसी समाज बांधव येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर महायुतीमधील अनेक बडे नेते या महाएल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले आहे.
ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याबरोबर ओबीसी समर्थक महायुतीचे नेते देखील उपस्थित राहणार आहे. मंत्री छगन भुजभळ, विधान परिषद आमदार पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे देखील नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची मागणी घटनेला धरुन नाही. रोज उठून त्यांच्या मागण्या बदलत आहे. आता एक समाज तीन तीम मागण्या करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये न्यायव्यवस्था आहे का नाही? पावणे चारशे गरिब जातींचा हा समाज आहे त्यांचं आरक्षण हिसकावून घेणं हे कोणत्या न्यायाला अन् घटनेला धरुन आहे, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.