Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! वृध्दाचा बेवारस अवस्थेत आढळला मृतदेह

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 04, 2021 | 03:38 PM
धक्कादायक ! वृध्दाचा बेवारस अवस्थेत आढळला मृतदेह
Follow Us
Close
Follow Us:

पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनामुळे बंद पडलेला व्यवसाय…त्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती अन त्यातच मुलांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील वृध्दाचा बेवारस अवस्थेत मृत्यू झाला. पारनेर बसस्थानकावरील चौकात इस्त्रीचा व्यवसाय करणारे सोमनाथ कुऱ्हाडे यांचा व्यवसाय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत बंद पडला. त्यातच अतीक्रमणात असलेली त्यांची टपरी महसूल विभागाने काढून टाकली.

व्यवसायाला जागा राहिली नसल्याने कुऱ्हाडे यांनी घरोघरी जाऊन कपडे गोळा करून इस्त्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृध्दावस्थेत ते काम जिकीरीचे होते. त्यामुळे व्यवसाय फारसा होत नव्हता. त्यातून उपासमार होऊ लागल्याने ते कामानिमित्त कल्याण येथे राहात असलेल्या मुलाकडे गेले. मात्र तेथेही चांगली वागणूक न मिळाल्याने कुऱ्हाडे परत पारनेरला आले.

सुपे औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करणाऱ्या हंगे येथे वास्तव्यास असलेल्या मुलाकडे राहण्यास गेले. मात्र त्यानेही या वृद्ध पित्याला थारा दिला नाही. त्याने थकलेल्या पित्याला पारनेर बसस्थानकावर आणून सोडले.

उपासमार व वृध्दत्वामुळे गलितगात

उपासमार व वृध्दत्वामुळे गलितगात्र झालेले कुऱ्हाडे दोन दिवस बसस्थानकावरील एका कोपऱ्यात पडून होते. बसस्थानकावर फारशी वर्दळ नसल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र तिसऱ्या दिवशी (दि. २६ अ‍ाॅक्टोबर) टाकळी ढोकेश्वर येथील आनंद सिंधू वृध्दाश्रमाचे संस्थापक विलास महाराज लोंढे यांना पारनेर बसस्थानकावर बेवारस अवस्थेत वृध्द व्यक्ती पडली असल्याचे समजले. त्यांनी तातडीने कुऱ्हाडे यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत मुलांना कळविले. मात्र मुलांनी प्रतिसाद दिला नाही. कोणीही रुग्णालयाकडे फिरकले नाहीत.

गंभीर आजारी असलेल्या कुऱ्हाडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात नुकतेच रूजू झालेले डॉ. पवन भावटे यांनी आत्मियतेने उपचार केले. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांना जेवण जाऊ लागले. मात्र उपचारापूर्वी उपासमार झालेली असल्याने त्यांना अतीसाराचा त्रास सुरू झाला. त्यातच उपचार सुरू असताना १ नोव्हेंबर रोजी कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाला.

समाज माध्यमातून आवाहन

संपर्क साधूनही कुऱ्हाडे यांची मुले प्रतिसाद देत नसल्याने विलास महाराज लोंढे यांनी, मुलांनी अंत्यविधीला उपस्थित रहावे असे आवाहन समाज माध्यमातून केले. त्यानंतर कुऱ्हाडे यांचा मुलगा ग्रामीण रुग्णालयात आला. त्याने मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.

Web Title: Old age man dead body found in parner nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2021 | 03:38 PM

Topics:  

  • Ahmednagar Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.