
फोटो सौजन्य: Gemini
प्रतिभा भैलुमे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुटुंब कर्जत येथे वास्तव्यास असून गुरुवारी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
फिर्यादीनुसार, कुटुंबीय झोपलेले असताना आरोपींनी घराचा दरवाजा जोरजोराने वाजवून अश्लील शिवीगाळ सुरू केली. खिडकीतून पाहिल्यावर दत्ता बबन भैलुमे, अक्षय बबन भैलुमे, तेजस बबन भैलुमे, भारती बबन भैलुमे (सर्व रा. सिद्धार्थनगर, कर्जत), कार्तिक निलेश गुंड (रा. गुंडवस्ती, कुळधरण रोड, कर्जत), शुभम सुरेश शिरोळे (रा. बुवासाहेब नगर, कर्जत) आणि यशराज राजकुमार आढाव (रा. बारडगाव व सुद्रिक, कर्जत) हे आरोपी लाकडी दांडके व कोयते हातात घेऊन घराबाहेर उभे राहून धमकावत असल्याचे दिसून आले.
घराबाहेर आल्यानंतर आरोपींनी “तुमचा मुलगा अनुराग शरद माने याला मदत करतो म्हणून मस्ती करत आहे,” असे म्हणत फिर्यादींच्या दिशेने कोयता फेकून मारला. मात्र फिर्यादी खाली वाकल्याने हा वार चुकला. त्यानंतर आरोपींनी अजय भैलुमे याला लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच “तुला वाचवायला कोणी आले तर ठार मारू,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report
घटनेदरम्यान शेजारी व नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. मात्र, जाताना आरोपींनी पुन्हा येऊन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचे कोयत्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत.