Only one Asian cricket team will be allowed to enter the 2028 Olympics! The excitement of the India-Pakistan match is bleak for fans...
Olympics 2028 : लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याची आस लावून बसलेल्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षाभंग होण्याच्या मार्गावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑलिंपिक २०२८ मध्ये फक्त सहाच देशांचे क्रिकेट संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये फक्त एका आशियाई संघाला पात्रता मिळवण्याची संघी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तान, दोन्ही दिग्गज संघ, ऑलिंपिकमध्ये आमनेसामने दिसण्याची शक्यता धूसर झाली आहे.
ऑलिंपिकमध्ये टी-२० स्वरूपात क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. ज्यामध्ये एकूण सहा क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये यजमान अमेरिका आणि इतर पाच संघांचा समावेश असेल, ज्यांची निवड पात्रता प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रादेशिक पात्रता अंतर्गत फक्त एकाच आशियाई संघाला स्थान देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
हेही वाचा : BAN VS PAK : पाकिस्तानचा संघ बांगलादेशसमोर पूर्णपणे फेल! 125 धावांवर गुंडाळल, घरच्या मैदानावर मालिका जिंकली
२०२४ च्या टी-२० विश्वचषकाचा विजेता भारत आणि मजबूत टी-२० संघांपैकी एक असणाऱ्या पाकिस्तान यांच्यामध्ये पात्रता फेरी दरम्यान अटीतटीची स्पर्धा असणार आहे. या अहवालात म्हटले आहे की, आशियातून फक्त एकाच संघाची निवड केली जाणार आहे. ज्यामुळे भारत-पाकिस्तानसारख्या हायहोल्टेज सामन्याची शक्यता जवळजवळ आता धूसर झालायचे दिसून येत आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी असणार आहे, कारण दोन्ही देशांमधील सामने बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी खूपच उत्साही असतात.
आयसीसीने ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणे ही क्रिकेटसाठी एक मोठी संधी मानली जात आहे, जी १९०० नंतर पहिल्यांदाच २०२८ मध्ये खेळवली जाणारा आहे. लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटसाठी तात्पुरते स्टेडियम उभारले जाणार आहेत. कारण अमेरिकेत मर्यादित कायमस्वरूपी क्रिकेट स्टेडियम आहेत. टी२० विश्वचषक रँकिंग आणि प्रादेशिक स्पर्धा पात्रता प्रक्रियेचा महत्वाचा आधार असणार आहेत. भारत हा संघ त्याच्या मजबूत असणाऱ्या रँकिंगमुळे, पात्रता मिळविण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि श्रीलंकासारखे देश सुद्धा आपली प्रबळ दावेदरी दाखवू शकतात.
हेही वाचा : IND W VS ENG W : कॅप्टन हरमनची धुव्वाधार खेळी, झळकावले इंग्लंड विरुद्ध तिसरे शतक!
भारत-पाकिस्तान या दोन संघातील क्रिकेट सामन्याची क्रेझ भारत आणि पाकिस्तानपूरती नसून ती पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. चाहते ऑलिंपिकसारख्या व्यासपीठावर या दोघांना आमनेसामने बघण्यासाठी नेहमीच आतुर असतात. तथापि, आशियाई कोटाच्या नियमामुळे ही शक्यता आता खूप कमी झाली आहे. तरीही, ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर या खेळाला अधिक अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात अधिकाधिक संघ सहभागी होण्यासाठी आयसीसी आणि ऑलिंपिक आयोजक क्रिकेटला अधिक आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.