Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror attack: बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही..; अजित पवारांचा थेट इशारा

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला. सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आणि पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 25, 2025 | 04:01 PM
Pahalgam Terror attack: बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही..; अजित पवारांचा थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले. अजित पवार म्हणाले की, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक लोक पर्यटनासाठी तिथे गेले होते. या हल्ल्यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेचा बदला कधी घेतला जाईल याची संपूर्ण देश वाट पाहत आहे,  “टाइट फॉर टॅट” असे उत्तर कधी दिले जाईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन तेथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
भारत गप्प बसणार नाही.

अजित पवार म्हणाले की, हा हल्ला इतका भयानक होता की संपूर्ण जगाने या घटनेची दखल घेतली आहे. निश्चितच, तुमच्या आणि आमच्या मनात आहे की या घटनेचा बदला घेतला पाहिजे आणि भारत बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. २२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगामजवळील एका पर्यटन केंद्रावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे.

Medha Patkar arrest : मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक; नेमकं कारण काय?

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला. सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आणि पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले. दूतावासही बंद करण्यात आला. पहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. आपल्याला मिळालेला राजकीय सुसंस्कृतपणा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच आहे. विचार मांडण्याची शिस्त, समाजप्रबोधनाची ताकद आणि सुसंस्कृत वर्तनाची गरज काय असते, हे सर्व काही आपण चव्हाण साहेबांकडून शिकलेलो आहोत, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राने मिळवलेला सुसंस्कृततेचा वारसा जपण्याची आणि पुढे नेण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वीच्या काळात राजकारण अधिक स्नेहपूर्ण होते. राजकीय वर्तुळात जवळीक, प्रेम आणि आपुलकीची भावना दिसून येत असे. मात्र हल्लीच्या काळात हा जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.  आपल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता आता पीडीसीसी बँकेच्या कामाकडे लक्ष देता येत नसल्यामुळे संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे माहिती दिली की, बँकेला जागेची आवश्यकता होती आणि काही दिवसांपूर्वी ५८ कोटी रुपये देऊन समोरील पारशी व्यक्तीची जागा खरेदी करण्यात आली आहे. आता त्या ठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, 1 कोटी रुपयांची

Web Title: Pahalgam terror attack india will not remain silent without taking revenge ajit pawars direct warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack

संबंधित बातम्या

Operation Alakh: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू; आतापर्यंत २ दहशतवादी ठार; काहींची ओळख पटली
1

Operation Alakh: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू; आतापर्यंत २ दहशतवादी ठार; काहींची ओळख पटली

दहशतवाद्यांना मदत केलेल्या आरोपीची नदीत उडी; कुटुंबियांचे लष्करावर गंभीर आरोप, व्हिडिओ आला समोर
2

दहशतवाद्यांना मदत केलेल्या आरोपीची नदीत उडी; कुटुंबियांचे लष्करावर गंभीर आरोप, व्हिडिओ आला समोर

पाकिस्तानच्या घशाला पडणार कोरड; चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा भारताचा निर्णय
3

पाकिस्तानच्या घशाला पडणार कोरड; चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा भारताचा निर्णय

आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी भारतात ‘मॅरेज जिहाद’; गुणरत्न सदावर्ते यांचे धक्कादायक विधान
4

आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी भारतात ‘मॅरेज जिहाद’; गुणरत्न सदावर्ते यांचे धक्कादायक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.