विनय सक्सेना मानहानी प्रकरणात मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना ताब्यात घेतले आहे. मानहानीच्या प्रकरणामध्ये त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्या अवामनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एलजी विनय सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
मानहानीच्या प्रकरणात मेधा पाटकर यांना दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दुपारी साकेत न्यायालयात हजर केले जाईल. मेधा पाटकर यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांची याचिका मागे घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मेधा पाटकर यांच्या वकिलाला नवीन याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मेधा पाटकर यांच्या नवीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायालयाचे आदेश जाणूनबुजून डावलत असल्याचे न्यायाकडून सांगण्यात आले आहे. त्या जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत, त्यांचा हेतू स्पष्ट आहे. न्यायालयात हजर राहणे त्या टाळत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या शिक्षेच्या अटी स्वीकारण्याचेही टाळत आहेत. असे कोर्टाने नमूद केलं. प्रोबेशन बॉन्ड सादर करण्याच्या आणि 1 लाख रुपयांचा दंड भरण्याच्या आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याबद्दल साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या एनडब्ल्यूबीच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मानहानीच्या प्रकरणात साकेत न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट बजावून दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांच्या अटकेची कारवाई केली.
पहलगाम दहशतवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मेधा पाटकर आणि व्ही.के.सक्सेना यांच्यामध्. 2000 सालापासून कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच खटल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी देखील झाली होती. तेव्हा न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार कारवाई करत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या पाठबळाचा थेट पुरावा समोर आला असून, या पार्श्वभूमीवर भारताने १९६० मधील ‘इंडस वॉटर ट्रीटी’ स्थगित केली असून, पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे हा हल्ला “स्थानिक जनतेचा भारतातील हिंदुत्ववादी सरकारविरोधातील उठाव” असल्याचे हास्यास्पद आणि निराधार कारण दिले गेले. मात्र, पाच ते सात प्रशिक्षित दहशतवाद्यांचा सहभाग, त्यांना स्थानिक दोन अतिरेक्यांची साथ, आणि सर्वांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, हे अधिकृत तपासात स्पष्ट झाले आहे.