Pakistani Player Imad Wasim has made Retirement as a Joke Left international cricket for the second time in a year
Imad Wasim Retirement : पाकिस्तान क्रिकेट संघात कधी आणि कोणत्या विचित्र गोष्टी घडतील हे कोणालाच माहीत नाही. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. वास्तविक, संघाचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने वयाच्या 35 व्या वर्षी दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इमादनेही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्ती घेतली होती, पण त्याने ICC टी-२० विश्वचषकासाठी निवृत्ती परत घेतली होती. इमादला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून खेळण्याची संधीही मिळाली होती.
इमाद वसिमची पुन्हा निवृत्ती
JUST IN: Imad Wasim has announced his retirement from international cricket.
Imad, who had previously retired in November last year, came out of retirement to play in the 2024 T20 World Cup pic.twitter.com/HFbCMpH0tn
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 13, 2024
PCB कडून वारंवार दुर्लक्ष
मात्र, त्यानंतर निवड समितीकडून त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आणि त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. अशा परिस्थितीत इमादने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इमादने पाकिस्तानकडून शेवटचा सामना T20 विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध खेळला होता, मात्र त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. मात्र, तो टी-20 लीगमध्ये खेळत राहणार आहे.
वादात अडकला होता
पीएसएल फायनल 2024 सामना पार पडला आणि इस्लामाबाद युनायटेडने पीएसएलच्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. इमाद वसीमने या सामन्यात चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्याचबरोबर तो आणखी एक कारणासाठी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सामन्यादरम्यान त्याने असे काही केले ज्यामुळे त्याच्यावर कौतुकाऐवजी टीका झाली.
ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना
सामन्यादरम्यान इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला होता. जेव्हा त्याचा संघ पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये बसून सिगारेट ओढत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. त्याचबरोबर त्याला ट्रोल सुद्धा केले जात आहे.