पांचट Jokes : शिक्षक… चिंटू, असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख आहेत पण तो उडू शकत नाही; उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! शिक्षकांच्या प्रश्नावर चिंटूचे हे मिश्किल उत्तर तुम्हाला नक्कीच हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढा आणि शिक्षक चिंटूचे हे मराठी जोक्स नक्की वाचा.
शिक्षक : तुम्ही कधी काही चांगले काम केले आहे का?
चिंटू : हो सर.. एक म्हातारा माणूस हळूहळू त्याच्या घरी जात होता.. मी त्याच्या कुत्र्याला सोडलं… तो लवकर घरी पोहचला
शिक्षक (मुलांना) : एक वाक्य सांगा ज्यात उर्दू, हिंदी, पंजाबी आणि इंग्रजी शब्ध वापरले असतील
चिंटू : इश्क दी गली विच No Entry!
शिक्षक बेशुद्ध…
शिक्षक : आपण वर्गात भांडलं का नाही पाहिजे?
चिंटू: कारण परीक्षेत कधी कोणाच्या मागे बसावे लागेल ते माहिती नाही…
शिक्षक : एका टोपलीत १० आंबे आहेत, त्यापैकी २ आंबे सडले, आता मला सांगा किती आंबे शिल्लक राहिले?
चिंटू : साहेब, १० आंबे
शिक्षक : ते कसं बरं?
चिंटू : सडले तर काय झालं आंबे तर आंबेच राहणार ना, केळी थोडीच होणार?
शिक्षक : मी जे पण विचारेल त्याच उत्तर पटापट द्यायचं
चिंटू : हो सर
शिक्षक : भारताची राजधानी सांगा
चिंटू : पटापट…
शिक्षक : बाबर भारतात कधी आला?
चिंटू : मला माहित नाही सर
शिक्षक : तुला बोर्डवर दिसत नाहीये, नावासोबत लिहिले तर आहे
चिंटू : ओह मला वाटलं, कदाचित तो त्याचा फोन नंबर असेल…
शिक्षक : जर एखादा छोटा ग्रह पृथ्वीवर आदळला तर काय होईल ते सांगा?
चिंटू : टणटण आवाज येईल.
शिक्षक : का?
चिंटू : कारण…सनी लिओनीने म्हटलं आहे, ये दुनिया पित्तल दी, पित्तल दी
शिक्षक : टीटू, मला सांग तो कोणता पक्षी आहे ज्याला पंख आहेत पण तो उडू शकत नाही
चिंटू : सर, मेलेला पक्षी
शिक्षक : चिंटू मला एक गोष्ट सांग पण त्याला गोष्टीला तात्पर्य असायला हवे
चिंटू : मी तिला फोन केला ती झोपली होती. नंतर तिने मला फ़ोन केला मी झोपलो होतो
तात्पर्य… जसे करावे तसे भरावे
शिक्षक : चिंटू सांग चंद्रावर पाहिलं पाऊल कोणी टाकलं?
चिंटू : निल आर्मस्ट्रॉंग
शिक्षक : बरोबर आणि दुसरं पाऊल कोणी टाकलं?
चिंटू : दुसरं पण त्यानेच टाकलं असेल ना, तो काय लंगडा थोडीच होता…
शिक्षक : बिरबल कोण होता?
चिंटू : मला माहित नाही, मॅडम?
शिक्षक: अभ्यासावर लक्ष देशील तेव्हा तर माहिती असेल ना
चिंटू : मॅडम, राजेश, विकी आणि सौरव कोण आहेत?
शिक्षक : मला काय माहित
चिंटू : मुलीकडे लक्ष द्याल तेव्हा तर माहिती असेल ना…
Web Title: Panchat jokes read teacher chintu funny marathi jokes and laugh out loud