Panchat Jokes Women Question To Doctor Will Make You Laugh Read The Funniest Jokes In Marathi
पांचट Jokes : डॉक्टर आणि महिलेची प्लास्टिक सर्जरी… वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! महिला डॉक्टरांकडे जाते खरं पण जाऊन असं काही विचारते की वाचून डॉक्टरच काय तर तुम्हालाही तुमचे हसू आवरता येणार नाही. कामातून थोडा वेळ काढून डॉक्टर महिलेचे हे मिश्किल संभाषण वाचा जरूर.
डॉक्टर : तुमच्या नवऱ्याला खूप विश्रांतीची गरज आहे, या झोपेच्या गोळ्या घ्या
महिला : डॉकटर या गोळ्या मी त्यांना कधी देऊ
महिला : हे त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहेत…
डॉक्टर : मॅडम, तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे बघता तसं माझ्याकडे बघा
महिला (लाडात) : पण का…?
डॉक्टर : मला तुमच्या डोळ्यात आयड्रॉप्स टाकायचे आहेत
डॉक्टर : जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा तुम्ही काय करता?
महिला : मी मंदिरात जाते
डॉक्टर : तुम्ही खूप चांगले करता, तुम्ही तिथे ध्यान करता, बरोबर?
महिला : नाही, मी लोकांचे बूट आणि चप्पल मिसळते आणि मग मी त्या लोकांना अस्वस्थ होताना पाहते
डॉक्टर : जर तुम्ही माझ्या औषधाने बरे झालात तर तुम्ही मला काय बक्षीस द्याल?
महिला : डॉक्टर, मी खूप गरीब माणूस आहे, माझा नवरा कबर खोदतो…मी त्यांच्याकडून तुमची कबर फुकटात खोदून घेईन
डॉक्टर : आता कसा वाटत आहे तुम्हाला?
महिला : डॉक्टर तुमच्या औषधांनी सर्दी-ताप तर गेला पण जीव घाबरल्यासारखा होत आहे
डॉक्टर : चिंता करू नका, औषध देत आहे त्याने ते पण निघून जाईल..
महिला : डॉक्टर कृपया, माझ्या नवऱ्याला आत बोलवा
डॉक्टर : विश्वास ठेवा घाबरण्याची गरज नाही, मी काहीच करणार नाही
महिला : तसं नाही ओ, तुमची ती सुंदर नर्स बाहेर एकटी आहे ना.. मला तुमच्यावर विश्वास आहे नवऱ्यावर नाही…
महिला : माझं वजन कसं कमी होईल?
डॉक्टर : मान हलवा, उजवीकडे आणि डावीकडे.
महिला : कधी करायचं?
डॉक्टर : जेव्हा कोणी तुम्हाला खायला बोलेल तेव्हा…
महिला खूप मेकअप करून डॉक्टरकडे जाते
डॉक्टर : तुम्हाला काही त्रास आहे?
महिला : मी खूप सुंदर दिसते पण मला विचारायचे आहे की या कुरूप मुली कशा जन्माला येतात
डॉक्टर : आता या प्रश्नाचे उत्तर तर तुमच्या आईपेक्षा चांगलं कुणीच देऊ शकतं नाही…
महिला : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर : ३ लाख रुपये..
महिला : (थोडा विचार करून) आणि जर प्लास्टिक आम्ही आणून दिला तर…
Web Title: Panchat jokes women question to doctor will make you laugh read the funniest jokes in marathi