Panchat Jokes Neighbour Asks Sister Where Is Your Mister Read Answer To Laugh Out Louder
पांचट Jokes : शेजारीण… काय ओ, वहिनी घरी भाऊ दिसत नाहीत? खट्याळ प्रश्नावर दिलेले खोचक उत्तर वाचाल तर हसून हसून पागल व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! शेजाऱ्या-शेजाऱ्यांमध्ये होणारी थट्टा-मस्करी आपल्यासाठी काही नवी नव्हे... आपल्या कामातून थोडा मोकळा वेळ काढून शेजाऱ्यांचे हे मिश्किल संवाद वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल.
मंग्या : आई, मी आताच शेजाऱ्यांच्या घरात I Love You चे पत्र टाकून आलो आहे, आता शेजारीण आणि तिचा नवरा बघतील काय ते
आई : पण का?
मंग्या : सकाळी आपल्याला टोमॅटो देत नव्हते ना मग आता भोगा
शेजारीण: तुमची भांडी खूप चमकत आहेत, तुम्ही भांडी धुण्यासाठी काय वापरता…?
बाई : नवरा..
शेजारी: कसा आहेस भाऊ?
बंड्या : ठीक आहे..
शेजारी : काय करतोयस?
बंड्या : मी मॅगी खातोय..
शेजारी : जास्त मॅगी खाऊ नये
बंड्या : तुला माहिती आहे का, माझे आजोबा १०२ वर्षे जगले..
शेजारी : मॅगी खाल्ली नाही म्हणून?
बंड्या : नाही, ते स्वतःच्या कामाशी काम ठेवायचे…
शेजारीण: वाहिनी, भाऊ काय दिसत नाहीत.
वाहिनी : आमचं भांडण झालंय, तो बागेत आहे.
शेजारीण: मी पाहिले की ते बागेत नाही.
वाहिनी : खोदून पाहिले का?
शेजारीण डायरेक्ट बेशुद्ध…
आजोबांना चालून चालून घराजवळ येताच श्वास घेण्यास त्रास होतो
शेजारीण: आजोबा, जरा मोठा श्वास घ्या
आजोबा श्वास घेऊ लागतात
शेजारीण: आजोबा, आता कसं वाटत आहे?
आजोबा : कोणता परफ्युम मारला आहे? फार छान वाटत आहे…
एकदा दोन शेजारी एकमेकांशी बोलत होते
पहिला म्हणाला : तुम्हाला माहिती आहे का मला २४ वर्षांपासून मूल झाले नाही
दुसरा म्हणाला : अरे, मग तू काय केले?
पहिला : मी २५ वर्षांचा असताना माझ्या कुटुंबाने माझे लग्न लावले आणि मग जाऊन मला मूल झाले
दुसरा शेजारी अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहे.
शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले
शेजारी : बंड्या, काय मग पुढे काय करायचा विचार आहे?
बंड्या : काय नाय, तुम्ही गेल्यावर आंबे खायला घेणार आहे
शेजारी तिथून उठलाच नाही …
काकांचा पाय मुरगळला
काका (काकूंना) : अगं, शेजाऱ्यांकडून मलम आण जा जरा
काकू : विचारलं ते नाहीये म्हणतायेत
काका : व्वा रे व्वा! काय तर म्हणे नाहीये, काही शेजारधर्म आहे की नाही?
काकू : जाऊ द्या! मी आपल्याकडचा मलम काढते
Web Title: Panchat jokes neighbour asks sister where is your mister read answer to laugh out louder