Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पादणारा दादला नको गं बाई ; Matrimonial ad मध्ये तिने ठेवलीये अफलातून अट

सोशल मीडियावर लग्नाच्या एका विचित्र जाहिरातीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. एका वृत्तपत्रात ही लग्नाची जाहिरात देण्यात आली आहे. एका तरुणीला आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. पण तिच्या मागण्या आणि त्यातही तिची अट पाहूनच सर्वजण चक्रावले आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 26, 2021 | 03:28 PM
पादणारा दादला नको गं बाई ; Matrimonial ad मध्ये तिने ठेवलीये अफलातून अट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वर (Groom) किंवा वधू (Bride) शोधण्यासाठी जाहिरात (Matrimonial ad) हे काही नवं नाही. या जाहिरातींमध्ये संबंधित तरुण-तरुणीची माहिती दिली जाते आणि त्यात त्यांना नेमका कसा जोडीदार हवा, ते सांगितलं जातं. सुंदर, स्वयंपाक येणारी, घर सांभाळणारी, शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी जोडीदार म्हणून हवी अशा अपेक्षा तरुणांना असतात.

तर जास्त शिकलेला, चांगली नोकरी असलेला, स्वतःचं घर असलेला, एकुलता एक आणि हँडसम मुलगा हवा… अशा अपेक्षा बहुतेक तरुणींची आपल्या भावी जोडीदाराबाबत असतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral) अशीच एक लग्नाची जाहिरात व्हायरल (Matrimonial ad viral post) होते आहे. ज्यातील अट तर सर्वांच्या कल्पने पलीकडे आहे.

[read_also content=”कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाण्याची टोचणी केल्याचा संशय; डॉक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-under-name-covid-vaccine-suspected-giving-glucose-water-10-arrested-including-doctor-couple-nrvb-147429.html”]

सोशल मीडियावर लग्नाच्या एका विचित्र जाहिरातीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. एका वृत्तपत्रात ही लग्नाची जाहिरात देण्यात आली आहे. एका तरुणीला आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. पण तिच्या मागण्या आणि त्यातही तिची अट पाहूनच सर्वजण चक्रावले आहेत.

Did someone put out a matrimonial ad for me pic.twitter.com/DKsbk0iijT — Aditi Mittal (@awryaditi) June 15, 2021

या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाच्या जाहिरातीला सर्कल केलं आहे. ज्या तरुणीसाठी वर शोधला जातो आहे, तिची ओळख सुरुवातीला या जाहिरातीत दिली आहे. तिचे केस शॉर्ट आहेत. शरीरावर तिनं piercings केलं आहे. ती स्त्रीवादी विचारसरणीची आहे. ती ३०शीतील आहे.

पुढे मुलीला नेमका कसा वर हवा आहे. मुलीच्या मागणीनुसार तिला असा मुलगा हवा जो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक असेल. त्याच्याजवळ एक बंगला किंवा किमान २० एकर फार्म हाऊस असावं. त्याचं वय २८ ते ३० असावं त्याला जेवणही बनवता यायला हवं.

[read_also content=”लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाने केलं असं काही ; संतापलेल्या नवरीनं श्रीमुखात दिली ठेवून अन् झाला ना VIDEO VIRAL https://www.navarashtra.com/latest-news/video-viral-angry-bride-slaps-to-relative-on-wedding-stage-know-the-details-nrvb-147322.html”]

जाहिरात इथंच संपली नाही. पिक्चर अभी बाकी आहे. या सर्व झाल्या मुलीच्या मागण्या पण तिची अट तर वाचा. जाहिरातीच्या शेवटी या मुलीने आपल्याला नेमका कसा वर नको, ते सांगितलं आहे. No farterz, burpers plz असं या जाहिरातीत म्हटलं आहे. म्हणजेच तिला ढुसकी सोडणारा आणि ढेकर देणारा नवरा नको आहे.

हे पाहून तर तुम्हालाही हसू आवरलं नसेल. जो कोणी ही जाहिरात वाचतो आहे, त्याची अशीच प्रतिक्रिया येत आहे. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

plz no farterz burpers woman matrimonial ad shocked people

Web Title: Plz no farterz burpers woman matrimonial ad shocked people nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2021 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.