पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi Demise) यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगर गाठून आईला अग्नी दिला, त्यानंतर ते त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालच्या 7 हजार 800 कोटीच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवला.
[read_also content=”जळून खाक झालेली गाडी, पाठीवर खोल जखम, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहून उडेल अंगाचा थरकाप https://www.navarashtra.com/sports/photo-gallery/cricketer-rishabh-pant-car-accident-photos-nrps-358040.html”]
आई हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवनातून व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे पश्चिम बंगाल इथल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. दरम्यान या कार्यक्रमात सहभागी कार्यक्रमात सहभागी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या आई हीरा बा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते
PM Modi flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri, in West Bengal, via video conferencing. West Bengal CM Mamata Banerjee, Union railway minister Ashwini Vaishnaw & other leaders present at the event in Howrah. pic.twitter.com/YFuoltdslX
— ANI (@ANI) December 30, 2022
वंदे भारत एक्सप्रेस हावडा आणि न्यू जलपाईगुडी मार्गावर धावणर आहे. ही ट्रेन 564 किमीचे अंतर 7.45 तासांत पुर्ण करणार आहे. या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत या वंदे भारत एक्सप्रेसमुळे तीन तासांचा प्रवास वेळ वाचवेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निळी-पांढरी रंगाची ही ट्रेन आहे. या ट्रेनचे बारसोई, मालदा आणि बोलपूर येथे तीन थांबे असतील. आधुनिक प्रवासी सुविधांसह वंदे भारत एक्स्प्रेसला नियमित प्रवासी, चहाचे व्यापारी आणि उत्तर बंगाल, सिक्कीम, हिमालयात प्रवास करणारे पर्यटक या दोघांनीही पसंती दिली असण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक ट्रेनला ड्रायव्हरसाठी दोनसह 16 डबे आहेत.