नवी दिल्ली – संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shradha Murder case) दिल्ली पोलिसांनी अखेर 6629 पानांचं दोषारोप (charge sheet) पत्र तयार केलं आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबनं (Aftaab Poonawala) अत्यंत निर्घृणपणे श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 हून अधिक तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचं काम त्यानं केलं. आता या क्रूरकर्म्याविरोधात पोलिसांनी 7 प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. 182 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. यातून आफताबनं हा गुन्हा कसा बारकाईनं आणि नियोजनपूर्वक केला, हे सिद्ध करण्यात आलंय. 75 दिवसांत ही चार्जशीट दाखल करण्यात आलीय.
दोषारोप पत्रातील 6629 पानांत आफताबच्या विरोधात तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे केस तयार करण्यात आली आहे. ज्या क्रूरतेनं आफताबनं श्रद्धाची हत्या केला, ते एकून अनेकांचं ह्रद्य हेलावून गेलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा हे प्रकरण उघड झालं तेव्हापासून आफताबला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येतेय. आफताबला या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा होईल, असं ही चार्जशीट तयार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनांही वाटतंय. दिल्ली महानगरदंडाधिकारी अविरल गुप्ता 7 फेब्रुवारीला या चार्जशीटवर सुनावणी करणार आहेत.
1. छतरपूर आणि गुडगावमध्ये सीसीटीव्हीत आफताब बॅगमधून मृतदेहांचे तुकडे नेताना दिसणे
2. जीपीएस लोकेशनवरुन आफताब घटनास्थळी होता.
3. लेयर्ड व्हॉईस एनालिसिस टेस्टमध्ये श्रद्धाला ऑडिओ मेसेज केल्याचं सिद्ध
4. मैहरोलीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचे डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी आणि भावाशी जुळणे
5. दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने मुंबई पोलसांकडे केलेल्या तक्रारीमुळे श्रद्धाच्या हत्येचा कट रचला, आफताबनं त्यावेळी तिला जीवे मारण्याची आणि तुकडे तपकडे करण्याची धमकी दिली होती.
6. श्रद्धाच्या मृतदेहाचे 13 भाग मिळालेत. त्यात हात, पाय, माथा, जबडा आणि केस सामील आहेत.
7. आफताबविरोधी पुराव्यांसाठी 9 टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यांनी हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीतून पुरावे जमा केलेत.
श्रद्धा हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये काय ?
1. 17 मे रोजी एनिव्हर्सरीच्या दिवशी आफताब आणि श्रद्धाचे भांडण झाले. त्यानंतर श्रद्धा तिच्या एका पुरुष मित्राकडे राहायला गेली.
2. दुसऱ्या दिवशी ती दुपारी 2 वाजता घरी आली. त्यानंतर आफताबशी तिचं परत भांडण झालं, त्यानंतर त्यानं तिची हत्या केली.
3. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 15 ते 20 तुकडे केले.
4. ही हत्या सुनियोजित नव्हती, तसचं रागाच्या भरात करण्यात आलेली नव्हती. श्रद्धापासून आफताबला सुटका हवी होती.
5. नार्को एनॅलिलिस टेस्ट आणि पॉलिग्राफ रिपोर्टमधून तपासाची दिशेचे पुरावे मिळाले
6. कात्री, चाकू, कुऱ्हाड अशी हत्यारं मिळाली ज्यांच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.
श्रद्धाची हत्या आणि पुरावे नष्ट करणे, या गुन्ह्यांखाली आफताबच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ही केस उभी केलेली आहे. त्याच्यावर गुन्हेगारी कटाचा आरोप लावण्यात आलेला नाही. त्या दोघांच्या नात्यांत असलेल्या अडचणींमुळं आफताबनं श्रद्धाची हत्या केल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय. चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, १७ मे २०२२ रोजी आफताब आणि श्रद्धात मोठं भांडण झालं. त्यानंतर श्रद्धा नाराज होऊन तिच्या एका पुरुष मित्राकडे निघून गेली. त्या मित्राची तिची ओळख डेटिंग एपवर झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परतली. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात भांडण झाले आणि नंतर आफताबनं तिची हत्या केली. आफताबनंच ही हत्या केल्याचं तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार सिद्ध होऊ शकतं. आता पोलिसांनी सादर केलल्या या चार्जशीटवर कोर्ट काय निर्णय घेणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे.