Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar Delhi PC; ‘आता मोदी शहाचं अजित दादांना न्याय देऊ शकतात..’; रोहित पवारांनी थेट पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय

"व्हीएसआर (VSR) या कंपनीच्या पाठीमागे मोठे शक्तीशाली लोक असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 21, 2026 | 01:38 PM
Rohit Pawar Delhi  PC;  ‘आता मोदी शहाचं अजित दादांना न्याय देऊ शकतात..’; रोहित पवारांनी थेट पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना सीसीटीव्ही माहिती नाकारली जात आहे.
  • सीआयडीने (CID) अद्याप एकही प्राथमिक अहवाल सादर न केल्याने संशय बळावला आहे.
  • ज्या कंपनीचे विमान (VSR) होते, त्यामागील बड्या हस्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे.
 

Rohit Pawar Delhi PC: “आम्ही गेल्या काही दिवसांपासून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. दिवंगत अजितदादांवर प्रेम करणाऱ्यांनी सीसीटिव्ही फुटेजबाबत माहिती मागितली होती. पण त्यांना ती दिली गेली नाही. तपास करणाऱ्यांकडेही ती माहिती आहे कि नाही माहित नाही. सीआयडीने अद्याप एकही रिपोर्ट दिलेला नाही. सरकारकडूनही अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आमच्या लोकांनाही माहिती मिळत नाही. पण आमच्या भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना मात्री एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून सहज माहिती मिळते.” असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.Ajit Pawar Death Conspiracy

२८ जानेवारी २०२६ ला बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजितदादांसह विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अपघातावर राज्यभरातून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अशातच रोहित पवार हेदेखील सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन पुरावे सादर करत आहेत. रोहित पवार यांनी आज दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघात हा अपघात नसून घातपात असल्याकडे लक्ष वेधल आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा हेच अजित दादांना न्याय देऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. “व्हीएसआर (VSR) या कंपनीच्या पाठीमागे मोठे शक्तीशाली लोक असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.(Ajit Pawar Plane Crash )

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणाबाबत त्यांनी मुंबईत एक सादरीकरण (Presentation) केले होते. त्यातून या कंपनीचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या बड्या लोकांशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे. संबंधित अपघाताला पूर्णपणे ‘व्हीएसआर’ कंपनी जबाबदार असतानाही, त्यांना वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असून हा एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो. आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच या प्रकरणात अजित पवारांना न्याय देऊ शकतात,” असे विधान करत त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.

नागरी उड्डाण मंत्री राम नायडूंची चौकशीपूर्वीच ‘लिअर जेट’ला क्लीन चिट

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम नायडू यांनी चौकशीपूर्वीच ‘लिअर जेट’ला क्लीन चिट देणारे विधान का केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुरुवातीला मंत्र्यांनी क्लिन चिट दिली आणि नंतर सूत्रांच्या हवाल्याने व्हीएसआरशी संबंध नसल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या, असा दावा त्यांनी केला. ज्यांनी व्हीएसआर कंपनीला कर्ज (Loan) दिले आहे, त्या व्यक्ती तेलगू देसम पक्षाशी (TDP) संबंधित आहेत, अशी खळबळजनक माहितीही रोहित पवारांनी यावेळी दिली.

धक्कादायक ! पुण्यातील वारजेत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने शाळेत सोडतो म्हणत कारमधून नेलं अन्

‘व्हीएसआर’ (VSR) कंपनी प्रकरणावरून आक्रमक झालेले आमदार रोहित पवार यांनी आता आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेवर (Privacy) गदा येत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. “भाजपचे ट्रोल्स माझ्या खासगी प्रवासाची माहिती आणि माझ्यासोबत असलेल्या सेलिब्रिटीच्या आधार कार्डाचे तपशील सोशल मीडियावर कसे काय पसरवू शकतात?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

माझ्या प्रवासाची आणि सेलिब्रिटीच्या आधार कार्डाची माहिती लीक कशी झाली?

रोहित पवार म्हणाले, “मी दिल्लीला कोणत्या विमानाने गेलो, माझ्यासोबत कोण होते, याची माहिती बाहेर कशी आली? विमानतळ प्राधिकरण (Airport Authority) किंवा व्हीएसआर कंपनी ही गुप्त माहिती भाजपच्या ट्रोल्सना का पुरवत आहे?” असा सवाल पवारांनी विचारला.

माझ्यासोबत असलेल्या सेलिब्रिटीच्या आधार कार्डाचे तपशील ट्रोल्सकडे असणे, हे अत्यंत गंभीर आहे. सर्वसामान्य नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) माहिती मागितली तर अधिकारी नकार देतात, मग ट्रोल्सना हे सर्व सहज कसे उपलब्ध होते? भाजपचे मोठे ट्रोल्स आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. आमच्या रिसर्चवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे का? ” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Rohit pawar delhi pc now modi can give justice to shahs ajit dada rohit pawar directly sought justice from prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • Delhi news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद
1

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन
2

शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य
3

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.