बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आज (13 मे ) परिणीती आणि राघव यांचा नवी-दिल्लीत साखरपुडा होणार आहे. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे हा सोहळा पार पडणार आहे. परिणीतीची बहिण अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) या साखरपुड्याला उपस्थित राहणार असून नुकतीच तीला लंडन विमानतळावर पाहण्यात आले यासोबत करण जोहर, दिया मिर्जासह अनेक सेलेब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
[read_also content=”जाळपोळ, हिंसाचार, गोळीबार आणि नंतर लाहोरमध्ये स्वागत… 84 तासांनंतर इम्रान खान मध्यरात्री स्वगृही परतले https://www.navarashtra.com/world/after-84-hours-imran-khan-arrives-home-at-midnight-in-lahor-pakistan-nrps-398530.html”]
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची अपेक्षा असताना, प्रियांका चोप्रा जोनास येथे दिसली. लंडन विमानतळावर ती परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंट समारंभात सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झाली आहे. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यामध्ये फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रीणी उपस्थित राहणार आहेत. फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात परिणीती आणि राघव लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सोहळा संध्याकाळी 5 वाजता सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि शीख विधींनुसार पार पडेल. सोहळ्याची सुरुवात सुखमणी साहिब पाठाने होईल आणि त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता प्रार्थना होईल.
प्रियांका आज सकाळी दिल्लीत येईल आणि थेट साखरपुड्याच्या कार्यक्रमात सामील होईल. प्रियांका तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून परिणीतीच्या साखरपुड्यासाठी येणार आहे. साखरपुडा होण्याच्या काही मिनिटं आधी ती पोहोचून दोघांना शुभेच्छा देणार आहे. प्रियांकाचा नवरा निक जोनस साखरपुड्याला हजर राहू शकणार नाहीये असं सांगितलं जातंय.