Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रस्त्यावर किंवा नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी न करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अनधिकृत ठिकाणी वाहने उभी केल्यास वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही वाहतूक विभागाने दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2026 | 01:48 PM
Pune Palkhi Traffic Advisory 2026, Ashadhi Wari Pune Routes, Sant Dnyaneshwar Palkhi Stay

Pune Palkhi Traffic Advisory 2026, Ashadhi Wari Pune Routes, Sant Dnyaneshwar Palkhi Stay

Follow Us
Follow Us:
  • पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल
  • पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल करण्याचे आदेश
  • पालखी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत विशेष वाहनतळांची व्यवस्था
 

Ashadhi Wari sohla 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीची कोंडी टाळणे आणि भाविकांचा प्रवास सुलभ करणे हा त्यामागील उद्देश आहे. या दोन दिवसांत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने तसेच लग्नसमारंभासाठी वापरली जाणारी वाहने या अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधांतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

पालखी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत विशेष वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी आपली वाहने केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंग ठिकाणीच उभी करावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय

प्रथेप्रमाणे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर एकत्र येतात. नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी), पाटील इस्टेट येथून दोन्ही पालख्या शहरात दाखल होतात. शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गे पालखी सोहळा मुक्कामी दाखल होतो. प्रथेप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहेत.

 

पालखी सोहळ्यानिमित्त बंद असलेले रस्ते (पहाटे 3 ते रात्री 8 पर्यंत)

– बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी (पर्यायी रस्ता – धानोरी रस्ता, अंतर्गत रस्ते)

– प्रादेशिक मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक (पर्यायी रस्ता – येरवडा कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता)

– सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट (पर्यायी रस्ता – पर्णकुटी चौक, मंगलदास चौक, आरटीओ चौक)

– नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक वाहतूक बंद

– बोपोडी चौक ते चर्च चौक (पर्यायी रस्ता – बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक, ओैंध रस्ता)

– पोल्ट्री फार्म चौक, ओैंध, बालेवाडी मार्ग (पर्यायी रस्ता – रेल्वे पोलीस मुख्यालय, ब्रेमेन चैाक)

– पिंपरी-चिंचवडमार्गे पुणे शहरात येणारी वाहतूक (भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक)

– शादलबाबा दर्गा, येरवडा ते पाटील इस्टेट, वाकडेवाडी, अभियांत्रिकी महाविद्यालय

– होळकर पूल ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकी वाहतूक बंद

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची ..

 

अभियांत्रिकी महाविद्यालय ते श्री संत तुकाराम पादुका चौक (सकाळी ८ ते रात्री ११)

– रेंजहिल चौक ते संचेती चौक (पर्यायी रस्ता – रेंजहिल, सेनापती बापट रस्ता, नळस्टाॅप चौक)

– खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (पर्यायी रस्ता – कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल)

– गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (पर्यायी रस्ता – कुंभारवेस चौक, आरटीओ चौक)

 

Ashadhi Wari 2026: पुणे महापालिकेची आषाढी वारीसाठी मेगा तयारी! मेट्रो …

श्री तुकाराम पादुका चाैक ते बेलबाग चौक (दुपारी १२ ते रात्री ११)

– फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता

– डेक्कन ते कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता

– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक ते टिळक चौक

– शनिपार चौक ते सेवासदन चौक

– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गाडगीळ पुतळा चौक

– जिजामाता चौक ते बुधवार चौक

– नेहरु चौक ते सोन्यामारुती चौक

 

 

बेलबाग चौक ते निवडुंगा विठाेबा चौक, पालखी विठोबा मंदिर (दुपारी २ ते रात्री १२)

– लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक ते सेवासदन चौक

– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते बेलबाग चौक

– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक

– देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक

– साेमवार पेठ पोलीस चौकी ते डुल्या मारुती चौक

– रामोशी गेट ते पालखी विठाेबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक

पोलिसांच्या सूचना

– पालखी मार्ग, तसेच लगतच्या मार्गावर १०० मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई

– पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते टप्याटप्याने खुले

– पालखी मुक्कामी आल्यानंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल

– आवश्यकतेनुसार टिळक चौक ते बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात एकेरी वाहतुकीचे निर्बंध तात्पुरते शिथिल

-पालखी आगमनाच्या दिवशी आळंदी रस्ता, मुंबई-पुणे रस्त्यावर पेट्रोल, डिझेल टँकरवर बंदी

– वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक (०२०- २६६८५०००, २६६८४०००)

– परगावाहून येणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

 

Web Title: Pune traffic changes ashadhi wari palkhi sohla july 9 routes closed diverted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.