फोटो सौजन्य: .pinterest
“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का ?
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने वारीची सुरुवात होते. श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.
ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेकदा अपमान सहन करावा लागला. ज्ञानदेवांच्या वडीलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाकडे वळले. त्यानंतर धर्मपिठाने त्यांना कठोर शासन दिलं. संन्यासाशी पोरं म्हणून ज्ञानेश्वर , निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई यांना कायमच समाजातील अनिष्ठ रुंढीं प्रथांमुळे डावललं गेलं होतं.
ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात. विठ्ठलपंत कुलकर्णी हे न चुकता आषाढी वारी करत असे. यातून त्यांच्या विठ्ठलभक्तीची प्रचिती येते. वडीलांची हीच प्रथा ज्ञानेश्वर महाजांनी सुरु ठेवली. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्यानंतर ज्ञानेश्वर आणि भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. ज्ञानेश्वर महाजांच्या समाधीनंतर ही वारीची प्रथा निरंतर सुरु ठेवली ती तुकाराम महाराजांनी.
आषाढी वारीसाठी निघताना तुकोबा देहूवरुन आधी आळंदीला ज्ञानदेव महाजांच्या समाधीजवळ जायचे. संत ज्ञानेश्वर माऊलीं’च्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे सुपुत्र ‘नारायण महाराज’ यांनी सुरू ठेवली.नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत बसवून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.
नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी ‘श्री गुरु हैबत बाबा’ यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला.असं म्हणतात की, गुरु हैबतबाबा यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. गुरुहैबत बाबा’ हे राज दरबारी एक सैनिक होते. त्यामुळे पालखीला एक शिस्तबद्ध आखणी नेंमण्यात आली होती. गुरुहैबत बाबा यांनी केलेल्या दिंडीच्या नियोजनाप्रमाणे आजही देहू आळंदीहून निघणारी पालखी ही शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुरी जाते.