राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर दावे केले. यामध्ये आज त्यांनी विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. आरोप प्रत्यारोपाच्या या राजकीय कलगीतुऱ्याचे सोशल मीडियावर देखील परिणाम दिसत आहेत. दोन्ही पक्षांचे समर्थक आपआपल्या नेत्याच्या समर्थनात उतरले आहेत.
फेसबुकवर एका युजर्सने अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
साक्षी सप्तसागर या युजर्सने अमृता फडणवीस यांच्या गायनाला टार्गेट केलं आहे.
विकास पवार नावाच्या एका वापरकर्त्यांने ‘आज जिंदगी की सबसे बडी गलती कर गया भंगारवाला’ असं म्हणत नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
मलिक म्हणाले होते की, फडणवीस आणि भाजपचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
मलिकांच्या आरोपांना अमृता फडणवीस यांचं उत्तर
मलिकांच्या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!’ असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल.”
त्यामुळे आता हे प्रकरण कितपत रंगणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.