Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 रुपयाचं, 10 रुपयाचं नाणं बंद झालंय का? चालणार नाही? RBI ने दिलंय ‘हे’ स्पष्टीकरण

काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 28, 2021 | 06:02 PM
1 रुपयाचं, 10 रुपयाचं नाणं बंद झालंय का? चालणार नाही? RBI ने दिलंय ‘हे’ स्पष्टीकरण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)काल म्हणजेच गुरुवारी वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात आरबीआयनं कोणते नाणे आणि नोटा (Currency and Coins) किती चलनात आहेत याची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर किती नोटा आणि नाणे जारी केले जातात तेही आरबीआयनं सांगितले. विशेष म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून दोन हजार रुपयाची नोट बंद केल्याची अफवा उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर आरबीआयचं हे स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे.

आरबीआय रिपोर्टनुसार, रिझर्व बँक Rs2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 हजाराच्या नोटा जारी करते. देशात अनेक ठिकाणी1 रुपयाचं नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नाही. काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.

प्रिंटिंगवर किती खर्च झाला?

गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी नोटांच्या आवकमध्ये 9.7 टक्क्याएवढी घट झाली आहे. 1 जुलै ते 31 मार्च 2021 पर्यंत नोटांच्या प्रिंटींगवर 4012.1कोटी रुपये खर्च झालेत. गेल्या वर्षी खर्चाची हिच रक्कम 4337.8 कोटी एवढी होती. नकली नोटा कोणत्या बँकेत किती आढळल्या त्यावरही आरबीआय रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. त्यात आरबीआयमध्ये 3.9 टक्के तर इतर बँकांमध्ये 96.1 टक्का एवढ्या नकली नोटा सापडल्या. 2020 ते 21 दरम्यान, 2, 08, 625 एवढ्या नकली नोटा पकडल्या तर 2019-20 मध्ये 2,96,695 तर 2018-19 मध्ये त्या 3,17, 384 एवढ्या होत्या.

स्टेट बँकेकडं किती चलन?

चलनातल्या नोटा, नाणे जारी करण्याचं काम रिझर्व बँक करते. त्याची व्यवस्था आरबीआयकडून केली जाते. या कामात इशू ऑफिस, करंसी चेस्ट आणि स्मॉल कॉईन डिपॉजिट मोठी भूमिका पार पाडतात. कारण ते देशभर पसरलेले असतात. 31 मार्च 2021 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करंसी चेस्ट नेटवर्कचा 55 टक्के हिस्सा होता. तुटलेल्या फाटलेल्या नोटांचं कोरोनानं बंद पडलेलं काम आता पुन्हा सुरु केल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.

बाजारात किती नोटा?

बाजारात कोणत्या मुल्याच्या किती नोटा आहेत याची माहितीही रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. जेवढ्या नोटा बाजारात आहेत, त्यापैकी 85.7 टक्के नोटा ह्या 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. 31 मार्च 2020 पर्यंत ही टक्केवारी 83.4 टक्के एवढी होती. बाजारात सर्वाधिक नोटांची संख्या ही 500 रुपयांच्या चलनाची आहे. एकूण चलनाच्या 31.1 टक्के एवढ्या पाचशेच्या नोटा बाजारात आहेत. त्यानंतर सर्वाधिक नोटा ह्या 10 रुपयांच्या आहेत, त्यांची एकूण चलनातली टक्केवारी ही 23.6 टक्के एवढी आहे. 31 मार्चपर्यंतच्या चलनाची ही माहिती आहे.

RBI annual report about currency in circulation includes bank notes and coins know the details

Web Title: Rbi annual report about currency in circulation includes bank notes and coins know the details nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 06:02 PM

Topics:  

  • bank notes
  • RBI

संबंधित बातम्या

New Guidelines : बँकेची मनमानी आता नाही चालणार! खात्यातून पैसे कापण्यापूर्वी मिळणार Alert; RBI चा नवा नियम काय?
1

New Guidelines : बँकेची मनमानी आता नाही चालणार! खात्यातून पैसे कापण्यापूर्वी मिळणार Alert; RBI चा नवा नियम काय?

500 Rupee Note: एका 500 रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी किती खर्च येतो? ती कुठे छापली जाते? RBI ने उघड केले संपूर्ण सत्य…
2

500 Rupee Note: एका 500 रुपयांच्या नोटेच्या छपाईसाठी किती खर्च येतो? ती कुठे छापली जाते? RBI ने उघड केले संपूर्ण सत्य…

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम
3

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.